Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अर्रर्र! आलिया नाही, तर स्पेनमध्ये जाऊन ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स करतोय रणबीर, फोटो जोरदार व्हायरल

अर्रर्र! आलिया नाही, तर स्पेनमध्ये जाऊन ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स करतोय रणबीर, फोटो जोरदार व्हायरल

या वर्षी १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt)यांनी लगीनगाठ बांधली होती. असे असले, तरीही हे कलाकार आपल्या कामाला प्राधान्य देत आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. रणबीर कपूर लव्ह रंजन यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या आगामी सिनेमाची शूटिंग करत आहे. यादरम्यान त्याचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, ही अभिनेत्री आलिया भट्ट नाहीये.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत व्हायरल फोटोत दिसणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आहे. या व्हायरल फोटोमध्ये रणबीरने श्रद्धाला दोन्ही हातांनी उचलून घेतले आहे. सोशल मीडियावर या फोटोने धुमाकूळ घातला आहे. हे फोटो स्पेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, असाही दावा केला जात आहे की, सध्या रणबीर आणि श्रद्धा लव्ह रंजनच्या सिनेमासाठी स्पेनचे शेड्यूल शूट करत आहेत.

रणबीरने केला श्रद्धा कपूरसोबत रोमान्स
या फोटोव्यतिरिक्त रणबीर आणि श्रद्धाचे आणखी अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर आणि श्रद्धा पाण्याच्या मध्यभागी उभे राहून रोमँटिक सीन चित्रित करत आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा चेहरा स्पष्ट दिसत नसला, तरी हा फोटो फक्त श्रद्धा आणि रणबीरचाच असल्याचे सांगण्यात येत आहे.

गाण्याच्या शूटिंगवेळचे आहेत फोटो?
माध्यमांतील वृत्तांनुसार, लव्ह रंजन (Luv Ranjan) यांच्या सिनेमातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान हे फोटो काढण्यात आले होते, जे लीक झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमुळे रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अलीकडेच, श्रद्धा कपूरची मेकअप आर्टिस्ट श्रद्धा नाईकने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती स्पेनमधील सिनेमाच्या सेटवर तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल माहिती देत होती. तसेच, ​​खुर्चीवर बसून श्रद्धा कपूरचा मेकअप करताना दिसली होती.

रणबीर कपूर शेवटचा २०२२मध्ये आलेल्या शर्माजी नमकीन या सिनेमात झळकला होता. तसेच, श्रद्धा कपूर ही २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाघी ३’ या सिनेमात दिसली होती. आता या दोघांच्याही सिनेमासाठी चाहत्यांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा