Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड आलिया भट्ट ते शेहनाज गिल, वजन कमी करण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी कसून घेतली मेहनत

आलिया भट्ट ते शेहनाज गिल, वजन कमी करण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी कसून घेतली मेहनत

मनोरंजन क्षेत्र म्हटलं की शरिराचा बांधा, ठेवण, फिटनेस, सौंदर्य या गोष्टींची चर्चा तर होतेच. आता जरी सौंदर्याची व्याख्या बदलत असली, तरी हे नाकारून चालणार नाही की, कितीही म्हटलं तरी फिट अँड फाईन असणाऱ्या अभिनेत्री चाहत्यांना अधिक भावतात. तसंही ऍक्टर्सचं काम फारसं काही सोप नसतं. त्यांना त्यांच्या अभिनयापासून फिटनेसपर्यंत सर्वच गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या शारिरीक वजनावर बरच काम केलंय. आपण ५ अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी फॅट टू फिट हा प्रवास करण्यासाठी बरीच मेहनत घेतली.

सोनाक्षी सिन्हा
या यादीतील पहिलं नाव कोणाचं समोर येत असेल तर सोनाक्षी सिन्हा. दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी ओळखली जाते, पण यासाठी तिला तिच्या फिटनेसवर बरीच मेहनत घ्यावी लागली. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षीला मोठा ब्रेक मिळाला दबंग या चित्रपटातून. तिने सलमान खानबरोबर काम करताना तिच्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. पण या चित्रपटासाठी तिला जवळपास ३० किलो वजन कमी करावं लागल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात काम करण्यापूर्वी तीचं वजन ९० किलोच्या आसपास होतं.

हेही पाहा- आलिया ते सारा, वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या अभिनेत्री

आलिया भट्ट
गेल्या काही वर्षांत आलिया भट्ट हे नाव चांगलंच गाजतंय. राझी, गंगुबाई काठियावाडी, २ स्टेट्स, गलीबॉय, डिअर जिंदगी यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या आलिया आता लाखो दिलों की धडकन बनलीये. पण अनेकांना हे माहित नसेल की आलियालाही तिच्या फिटनेसवर मेहनत घ्यावी लागलेली. अनेक रिपोर्ट्सनुसार, स्टुडन्ट ऑफ द इयर चित्रपटात काम करण्यापूर्वी आलियाला जवळपास २० किलो वजन कमी करण्यास सांगण्यात आलेलं. त्यामुळे तिने जिममध्ये चांगलाच घाम गाळला. तिनेही हे चॅलेंज स्विकारत ३ महिन्यात १६ किलो वजन कमी केलेलं. आजही ती तिची फिटनेस ठेवण्यासाठी मेहनत घेत असते.

भूमी पेडणेकर
फॅट टू फिट प्रवास केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत भूमी पेडणेकरचे नाव तर यायलाच हवं. खरंतर अनेक अभिनेत्री चित्रपटांसाठी वजन कमी करतात, पण भूमीने तिच्या पहिल्या दम लगा के हैश्शा या पदार्पणाच्या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. तिने जवळपास ७० किलोहूनही अधिक वजन वाढवलेले, सारा अली खान पण या चित्रपटानंतर ती टॉयलेट एक प्रेमकथामध्ये एकदम स्लिम ट्रिम दिसलेली. तिने जवळपास २७ किलो वजन कमी केल्याचं म्हटलं जातं. पण यासाठी तिलाही आपल्या शारीरिक वजनावर बरंच काम करावं लागलेलं.

सारा अली खान
सारा अली खानचेही नाव या यादीत येतं. साराने सोशल मीडियावरही तिचे काही पूर्वीचे फोटो शेअर केलेले, ज्यात ती चांगलीच गुबगुबीत असल्याचे दिसते. जवळपास ९६ किलो वजन असल्याने साराला आरोग्याच्याही समस्या जाणवल्या होत्या. पण अभिनय क्षेत्रात यायचं म्हणजे आपल्या फिटनेसवर तिला काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे तिनेही वर्कआऊट आणि डाएटवर लक्ष देत तब्बल ३० किलोहून अधिक वजन कमी केलं. आज सारा उदयोन्मुख अभिनेत्रींपैकी एक आहे.

शेहनाज गिल
शेहनाज गिल बिग बॉस १३ मुळे चांगलीच प्रसिद्ध झाली. पण याचवेळी तिला तिच्या वजनामुळे अनेकदा ट्रोलही व्हावे लागले. त्याच ट्रोलर्सला उत्तर द्यायचं म्हणून शेहनाजने आपल्या डाएटवर लक्ष देत ६ महिन्यांत १२ किलो वजन कमी केलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा