Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! रितेश अन् जिनिलिया अडचणीत? भाजपने लावला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

मोठी बातमी! रितेश अन् जिनिलिया अडचणीत? भाजपने लावला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख अडचणीत सापडले आहेत. त्यांनी मागील वर्षी त्यांच्या देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची घोषणा केली होती. यानंतर त्यांना 10 दिवसांमध्येच कंपनीसाठी भूखंड मंजूर झाला होता. आता या कंपनीच्या जागेवरून आणि कर्जावरून मोठा वाद उभा ठाकला आहे. या जोडप्यावर भाजपकडून मोठा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, चला तर जाणून घेऊया…

भाजप नेत्याचा आरोप
भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मोरे (Pradeep More) यांनी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणावर घणाघाती आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की, “लातूरमध्ये भूखंड मंजूर करण्यासाठी 2 वर्षांपासून 16 कंपन्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, 2021मध्ये स्थापन झालेल्या देश ऍग्रो कंपनीला लगेच भूखंड मिळाला.” यावर भाजपचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मागे (Gurunath Mage) यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

कंपनीला दिलेल्या कर्जावरही उपस्थित केले प्रश्न
विशेष म्हणजे, देश ऍग्रो या कंपनीत रितेश आणि जिनिलिया यांची बरोबर भागीदारी आहे. ही जमीन कंपनीला लातूरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) या क्षेत्रात 605 रुपये प्रति चौरस मीटर या सवलतीच्या दराने देण्यात आली आहे. त्यासाठी या कंपनीने 15.29 कोटी रुपये खर्च केले आहेत. केवळ जमीन वाटपावरच नाही, तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऑक्टोबर 2021 आणि जुलै 2022 मध्ये कंपनीला दिलेल्या जवळपास 116 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जाबाबतही कंपनीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भाजपने लावला सत्ता दुरुपयोगाचा आरोप
भाजपच्या जिल्हा युनिटने माहितीच्या अधिकाराचा (आरटीआय) वापर करून जमिनीच्या वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, हा सत्तेचा निव्वळ दुरुपयोग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा असून काँग्रेस नेते अमित देशमुख हे त्याचे भाऊ आहेत. अमित हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. त्यांच्याच कार्यकाळात ही जमीन देण्यात आली होती. विशेष म्हणजे, तेव्हा अमित हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शर्लिन चोप्राने केली साजिद खानविरोधात तक्रार, ‘बिग बॉस 16’ मधून काढण्याची विनंती
जान्हवी कपूरने बहिणीला दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, कोणत्याच अभिनेत्याला करु नको …

हे देखील वाचा