दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लाडक्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर ग्लॅमरस बहिनी आता अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात आहे. कपूर कुटुंबियांच्या या लाडक्या मुली आज बॉलिवूडच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता तिची छोटी बहिण खुशी देखिल लवकरच इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.
जान्हवीने आपल्या अभिनयाची सुरुवात 2018 साली प्रदर्शित झालेला ‘धडक’ चित्रपटातून केली होती. मात्र, हा चित्रपट फार प्रगती करु शकला नाही. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर (janhvi Kapoor) सोबत इशान खट्टर (Ishan Khattar) मुखय भूमिकेत होता. दोघांनीही याच चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर यांनी वेगवेगळ्या अनेक चित्रपटात काम केले आहेत.
जान्हवीला एका मुलाखतीदरम्यान असा प्रश्ना विचारला की, अगदी थाटामध्ये तिने सगळ्यांना उत्तर दिले, आणि तिचे उत्तर ऐकून अनेकांना धक्काच बसला. एका रिपोर्टरने प्रश्न वाचारला होता की, तुझ्या बहिणीला इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी काय सल्ला देशिल. तेव्हा जान्हवीने अगदी थाटामध्ये अत्तर देत सांगितले की, ”मी आणि खुशी आमचा जसा स्वभाव आहे त्यावरनं मला वाटतं की,आम्ही कोणत्याही अभिनेत्याला डेट केलं नाही पाहिजे,आमच्यासाठी हे खूप योग्य राहील”.या व्यतिरिक्त जान्हवीनं अजून एक सल्ला खुशीला देत म्हटलं की,”तिनं स्वतःचं महत्त्व ओळखायला हवं. इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावर जे आपल्याविषयी बोललं जातं त्यात विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. त्याची गरजही नसते. मी तर हेच सांगू इच्छिते की तुला जे काही मिळालं आहे,ते तुझ्या योग्यतेमुळेच मिळालं आहे,आणि यापेक्षाही चांगलं स्वत: करुन दाखवायचं आहे”.
जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा देखिल बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. हा चित्रपट सर्व नवीन कलाकारांसोबत बनत असून 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट किती यशस्वी ठरेल हे पाहे खूपच रंजक ठरणार आहे.(janhvi kapoor advice to younger sister khusi kapoor raed here watch movie)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’
‘प्रेग्नन्सीचं ड्रामा करते’, म्हणणाऱ्यांवर संतापली दीपिका कक्कर; व्हिडिओ शेअर करत म्हणाली…