Thursday, September 28, 2023

रितेश-जिनिलीयाचा ‘तो’ रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘रितेश दादा आणि वहिनी..’

लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि त्यांच्यातील प्रेम आणि नातेसंबंधाचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात.नुकताच रितेशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि जिनिलीया एकमेकांच्या डोळ्यात पाहून प्रेमळपणे हसत आहेत.

हा व्हिडिओला पोस्ट करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही एकत्र असतो तेव्हा अधिक चांगले दिसतो.” तसेच त्याने “उड दी फिरा…” हे गाणे लावले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “रितेश दादा आणि वहिनी बेस्ट कपल आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “जगातील सर्वोत्कृष्ट गोंडस जोडपे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दोघाची जोडी ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘तुझे मेरी कसम’, ‘मिस्ट मम्मी’, ‘वेड’ या चित्रपट एकत्र काम केले आहे. रितेश देशमुख यांने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘मस्ती’, ‘मैं हूं ना’, ‘मलमल’, ‘ब्लफमास्टर’, ‘हे बेबी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘हाउसफुल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रितेश देशमुख हा एक यशस्वी निर्माता देखील आहेत. 2023 मध्ये, रितेश देशमुख ‘वेड’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात त्यांची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. ‘वेड’ हा रितेश देशमुख यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट आहे. (Actor Ritesh Deshmukh and actress Genelia Deshmukh romantic video viral)

अधिक वाचा-
गणेशा तुझा मला छंद..! बाप्पाच्या आगमनासाठी अनुष्का शर्माची जोरदार तयारी, शेअर केला फोटो…
उर्फी जावेदने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन; अभिनेत्रीचा चष्मा पाहून चाहत्यांना लागले वेड,पाहा फोटो

हे देखील वाचा