Sunday, June 23, 2024

खरंच की काय! ‘या’ कारणामुळे रितेश देशमुख लग्नात आठवेळा पडला होता पत्नी जेनेलियाच्या पाया

बॉलिवूडमधील सर्वात नावाजलेले व सर्व चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपे म्हणजे, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होय. हे जोडपे ही प्रत्येकाची पहिली पसंती राहिली आहे. त्यांनी शेअर केलेले व्हिडिओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यासोबतच, ते दोघेही सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्यामुळे ते प्रत्येकवेळी चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत राहतात. अलीकडेच हे जोडपे डान्स रिऍलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये आले होते. दोघांनी त्या काळात त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही मजेदार किस्से देखील सांगितले होते. या शोमध्ये जेनेलियाने एक खुलासा केला की, तिचा पती रितेशने लग्नादरम्यान एकदा नव्हे, तर आठ वेळा तिच्या पाया पडला होता.

जेनेलियाने शो दरम्यान सांगितले की, “आम्ही आमच्या लग्नाचा अतिशय वेगळ्या पद्धतीने आनंद घेतला, विधी पार पाडले.” जेनेलिया म्हणते, “मी पारंपारिक विवाहसंस्कृतिला प्राधान्य देते. तर रितेश देशमुखसारखा नवरा मिळवण्यासाठी मी स्वतःला खुप भाग्यवान समजते. आमच्या लग्नाची प्रत्येक पार्टी माझ्यासाठी एक धमाका होता. मी सासरी जातानाही खूप रडले होती. मात्र त्यावेळी रितेशला आठ वेळा माझ्या पाया पडाव्या लागल्या होत्या.

हा खुलासा केल्यानंतर जेनेलिया थोडं हसली. यानंतर रितेश म्हणाला की, “पुजाऱ्याला माहित होतं की मला हेच आयुष्यभर करायचं आहे. त्याने मला आधीच याची जाणीव करून दिली होती.”

रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि 2012मध्ये ते विवाहबंधनात अडकले. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. (genelia cried loudly on this occasion at the wedding but riteish deshmukh did)

अधिक वाचा- 
चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! रस्त्यावर आढळला दिग्गज अभिनेत्याचा मृतदेह, सिनेविश्वात खळबळ
वेतन समानतेवर काजोलने मांडले मत; म्हणाली, ‘भारत प्रगती करत आहे, पण…’

हे देखील वाचा