Wednesday, June 18, 2025
Home बॉलीवूड गणेशा तुझा मला छंद..! बाप्पाच्या आगमनासाठी अनुष्का शर्माची जोरदार तयारी, शेअर केला फोटो…

गणेशा तुझा मला छंद..! बाप्पाच्या आगमनासाठी अनुष्का शर्माची जोरदार तयारी, शेअर केला फोटो…

गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी गणेशमूर्ती बनवल्या जातात. यावेळी हा सण 19 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेश चतुर्थी साजरी होत आहे. त्यामुळेच बॉलिवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गणेशोत्सवाच्या आगमनाने सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी सुद्धा गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली या लोकप्रिय जोडप्याच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन होणार आहे. या जोडप्याने गणेशोत्सवाच्या तयारीची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने घरातील गणेशोत्सव सजावटीची झलक दाखवली आहे.

अनुष्काने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,“जेव्हा गणपती बाप्पासाठी तुम्हाला घरातील संपूर्ण फर्निचर शिफ्ट करायचं असतं तेव्हा जिम ही एकमेव जागा असते. जिथे तुम्ही सगळ्या वस्तू ठेऊ शकता.” अनुष्का आणि विराट हे दोघेही गणेशोत्सव साजरा करतात. गेल्या वर्षीही त्यांनी घरी बाप्पाची स्थापना केली होती. यावर्षीही ते बाप्पाला आपल्या घरी आमंत्रित करणार आहेत.

अनुष्काच्या घरची जिम सध्या जिमच्या उपकरणांशिवाय मोठा सोफा, टेबल- खुर्च्या आणि इतर फर्निचरने भरल्याचं या फोटोमध्ये बलायला मिळत आहे. श्रीलंकेहून परतल्यावर विराट कोहली, पत्नी अनुष्का आणि लेक वामिकासह गणेशोत्सव जोमात साजरा करणार आहे. गणेशोत्सव हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान गणेशाच्या आगमनाच्या आणि त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.(See photos of actress Anushka Sharma and Indian batsman Virat Kohli preparing for Ganeshotsav at their home)

अधिक वाचा-
50शी ओलांडूनही उर्मिला मातोंडकरचा फिट आणि ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल
किंग खानचा जलवा कायम! ‘जवान’ने मारली ‘इतक्या’ कोटींची मजल; एकदा वाचाच

हे देखील वाचा