Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड करीना कपूरच्या चिमुकल्यासाठी आत्या सबा अली खानकडून पॅपराजींची खरडपट्टी; वाचा काय म्हणाली

करीना कपूरच्या चिमुकल्यासाठी आत्या सबा अली खानकडून पॅपराजींची खरडपट्टी; वाचा काय म्हणाली

चित्रपटसृष्टीतील कलाकार जितके प्रसिद्ध असतात, कदाचित तितकीच प्रसिद्धी त्यांच्या मुलांनाही असते. यामुळेच सामान्य व्यक्तींपासून ते पॅपराजींपर्यंत अनेकजण त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलांचेही असेच काहीसे आहे. करीनाची मुलं तैमूर आणि जेह पॅपराजींमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत असतात. जेह जेव्हाही आई करीना किंवा आयासोबत असतो, तेव्हा त्यांच्या अवतीभोवती कॅमेरेच कॅमेरे असतात. मात्र, पॅपराजींच्या याच व्यवहारासाठी सैफ अली खानची बहीण सबा अली खानने निराशा व्यक्त केली आहे. सबाने एक व्हिडिओ शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.

सबा अली खानने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्स आयाला सतत पुकारत आहेत. जेणेकरून ते जेहचा फोटो क्लिक करू शकतील. दुसरीकडे, जेहच्या चेहऱ्यावर फोटोसाठी फ्लॅशचाही वापर केला जात आहे. (Actor Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Fumed After Seeing Photographers Chasing Newphew Jeh)

हा व्हिडिओ स्टोरीवर पोस्ट करत सबाने जेहला चिंतेत पाहून फोटोग्राफर्सला फटकारले आहे. तिने लिहिले की, “एका मुलाला त्रास द्यायला पाहिजे, असं मीडियाला वाटतं का? बदल? हा व्हिडिओ पाहा. थांबा. तो लहान मुलगा आहे.”

Photo Courtesy: Instagram/sabapataudi

यापूर्वीही सोहा अली खानची मुलगी इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी जेहसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत दिसते की, सबा अली खानने जेहला कडेवर घेतले होते. तिने लिहिले होते की, “जेह…माझा जीव…मिसिंग माय मंचकिन. खूप प्रेम डंपलिंग. नेहमीच तुझे रक्षण करेल. मला वाटते त्याला माझे कानातले आवडतात. तो ओढण्याचा प्रयत्न करत आहे.”

दुसरीकडे, सबा अली खानच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. एका युजरने लिहिले की, “जेह फ्लॅश आणि इतक्या आवाजाने घाबरल्याचे दिसत आहे.” तसेच सबा आणि तैमूरच्या फोटोलाही चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली होती. एका युजरने लिहिले की, “असे वाटत आहे की, शर्मिला टागोरने बेबी रणधीर कपूरला कडेवर घेतले आहे.”

काही दिवसांपूर्वी सबाने आपले आई- वडील शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला होता. सबा नेहमीच आपले आई- वडील आणि भावंडांचे फोटो शेअर करत असते. तिचा इंस्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा