Tuesday, April 16, 2024

‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

‘बिग बॉस ओटीटी’ची माजी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दरदिवशी तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल होत राहते. तिची स्टाईल बघून असे वाटते की, तिला याची पर्वाच नाही. कदाचित यामुळेच ती पुढच्या वेळी अधिकच हॉट आणि वादग्रस्त अंदाजात बाहेर पडते. अलीकडेच, अभिनेत्रीने असा बॅकलेस टॉप घातला होता, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

उर्फी जावेद आजकाल पॅपराजीची आवडती सेलिब्रिटी आहे. ती जिथे जाईल तिथे पॅपराजी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी वाया घालवत नाहीत. त्याचबरोबर उर्फी सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. दररोज ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. त्याचबरोबर चाहतेही उर्फीच्या लेटेस्ट फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. पण अनेक वेळा तिला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. असे असूनही, उर्फी कोणाचीही पर्वा न करता तिचे फोटो पोस्ट करत असते. दरम्यान, पुन्हा एकदा उर्फीच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर आग लावली आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीची फॅशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. (bigg boss ott contestant urfi javed trolled for backless top people got confuse)

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने पुन्हा एकदा तिच्या फॅशनने इंटरनेटवर आग लावली आहे. दुसरीकडे, उर्फीचा ड्रेस पाहून पुन्हा एकदा चाहते चक्रावले आहेत. तिचा हा ड्रेस कोणालाच समजत नाहीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने नारंगी बॅकलेस टॉपसह पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. त्याच वेळी, उर्फीचा टॉप कोणत्याही स्ट्रॅपशिवाय व्यवस्थित आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलंय की, “माझ्या आवडत्या डिशचा अंदाज लावा?”

एकीकडे अनेक चाहते उर्फी जावेदचा हा व्हिडिओ पसंत करत आहेत. त्याचबरोबर अनेकजण तिला याबद्दल ट्रोलही करत आहेत. अनेकजण यावर विचित्र कमेंट्स करत आहेत. बरेच युजर्स उर्फीला तिच्या शिंपीबद्दल विचारत आहेत, जो तिचा ड्रेस बनवतो. त्याचवेळी अनेकांनी विचारले आहे की, असे ड्रेस का घालावेत? शिवाय या व्हिडिओला अल्पावधीत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जामीन मिळवण्यासाठी किंग खानकडे आहेत केवळ सात दिवस, मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहचला अभिनेता

-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

हे देखील वाचा