‘मैने प्यार किया’मधील सलमान खान आणि भाग्यश्री हे क्यूट कपल चाहत्यांना आजही आठवते. या चित्रपटाने एका रात्रीत लाखो हृदयांची धडकन बनलेली भाग्यश्री नुकतीच ‘बिग बॉस १५‘च्या मंचावर सलमानसोबत दिसली. या जोडीने पुन्हा एकदा जुने क्षण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच खास कारणामुळे आता पुन्हा एकदा भाग्यश्रीला सलमानची आठवण आली आहे.
फूड जॉइंट पाहून भाग्यश्रीला आले नाही हसू आवरता
सलमानने (Salman Khan) नुकताच वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाआधी सलमान त्याच्या फार्म हाऊसवर असताना त्याला साप चावला होता. सलमानला काही झाले नसले तरी, सलमानच्या साप चावण्याच्या घटनेची बरीच चर्चा झाली होती. सर्व काही ठीक असल्याचे पाहून सलमानच्या अनेक सहकलाकारांनीही या घटनेवर मस्ती केली. आजकाल भाग्यश्री (Bhagyashree) मसुरीच्या डोंगराळ भागात फिरायला गेली होती. तिथे जेव्हा तिची नजर एका फूड जॉइंटवर पडली तेव्हा तिला सलमानला चिढवण्याची संधी मिळाली.

भाग्यश्रीने सलमान खानसोबत केली मस्ती
भाग्यश्रीने फूड जॉइंटच्या होर्डिंगचा फोटो काढला आणि तो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या होर्डिंगवर ‘पहाडी बेकर्स अँड स्नेक्स पॉईंट’ असे लिहिले आहे. तर येथे साप असायला हवा होता. हे पोस्टर शेअर करत भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज हेे पाहिले आणि वाटले… सलमान खान तुम्हाला इथे जायला आवडेल का?”
मसुरीच्या दऱ्याखोऱ्यात फिरत आहे भाग्यश्री
भाग्यश्री सध्या तिच्या पतीसोबत मसूरी हिल स्टेशनवर सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनेत्री अतिशय सुंदर पद्धतीने तिचा फोटो शेअर करून डोंगराळ भागातील सौंदर्य सांगत आहे.
सलमान खानने स्वतःच्या पनवेलच्या फार्महाऊसवर साप चावल्याची घटना सांगितली होती. सलमान म्हणाला होता की, “फार्महाऊसवर माझ्या खोलीत एक साप घुसला आणि मुले घाबरली, म्हणून मी त्याला काठीने बाहेर काढले. मग हळू हळू तो आला आणि माझ्या हाताला गुंडाळला. मग मी त्याला सोडवण्यासाठी दुसऱ्या हाताने पकडले. माझ्या कर्मचार्यांनी साप पाहिल्यावर त्यांना तो विषारी वाटला, त्यानंतर झालेल्या गोंधळात साप मला एकदा नव्हे, तर तीनदा चावाला.”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कोरोनामुळे त्याच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. याशिवाय अभिनेता ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग करणार आहे.
हेही वाचा :
- रिया चक्रवर्तीने सर्व मुलींना दिला सल्ला, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली; ‘स्वतःबद्दल काय विचार करता…’
- चक्क चाहत्याने मुलाला रामायणातील ‘राम’ उर्फ अरुण गोविल यांच्या ठेवले पायाशी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
- ‘मुलाला मराठी बोलता येते’ या गोष्टीसाठी सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला मिळाली होती परवानगी