Thursday, April 25, 2024

‘मुलाला मराठी बोलता येते’ या गोष्टीसाठी सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला मिळाली होती परवानगी

प्रत्येक कपलची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आणि त्यांच्यासाठी खास, लक्षात राहणारी असते. याला मग सामान्य असो किंवा सेलिब्रिटी असा कोणताच अपवाद नसतो. ज्या व्यक्तीवर प्रेम केले तीच आपल्या आयुष्याचा जोडीदार व्हावी यापेक्षा सुंदर असे काय असावे. कलाकार, क्रिकेटर आदी अनेक सेलिब्रिटींची लव्हस्टोरी आपल्याला माहित असते, किंवा जाणून घेण्याची इच्छा असते. तसे पाहिले तर बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे खूपच जुने, घनिष्ठ नाते आहे. अनेक क्रिकेटर्सने बॉलिवूडमधील कलाकारांसोबत संसार थाटला आहे. याची अनेक उदाहरणं देखील आपल्या समोर आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट टीममधील गोलंदाज असणारा झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांची प्रेमकहाणी सांगणार आहोत.

भारतीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान आणि यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा झहीर खान आणि ‘चक दे इंडिया’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ असे हिट सिनेमे देणारी सागरिका घाटगे ही फॅन्सची सर्वात आवडती आणि प्रसिद्ध जोडी आहे. दोघेही एकमेकांना सतत कॉम्प्लिमेंट करताना दिसतात. या दोघांची प्रेमकहाणी सुरु कशी झाली? एका राजघराण्यातून आणि मराठी पार्श्वभूमी असलेल्या सागरीकाने झहीर खानला जोडीदार म्हणून निवडल्यानंतर तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? आदी अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया.

मीडियामधील एका माहितीनुसार या दोघांची भेट एका कॉमन मित्राद्वारे झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या आणि त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यांना अनेकदा सोबत पाहिले जायचे, त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक बातम्या मीडियामध्ये फिरत होत्याच. मात्र झहीर खान आणि सागरिका यांच्यातले खास नाते त्यावेळी समोर आले, जेव्हा ते दोघंसोबत युवराज सिंग आणि हेजल यांच्या लग्नसमारंभात पोहचले होते. तोपर्यंत केवळ त्यांच्या अफेयर्सच्या बातम्या येत होत्या.

जेव्हा त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा झहीर दिल्ली डेअरडेव्हिल्स या आयपीएल संघाचा कप्तान होता. त्याला चियर करण्यासाठी सागरिका अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित असायची. या दोघांचे डेटिंग सुरु झाल्यानंतर त्यांना त्यांचे नाते लग्नात बदलायचे होते, मात्र त्या दोघांच्या लग्नात मोठी अडचण होती दोघांचे वेगवेगळे धर्म. झहीर मुस्लिम तर सागरिका हिंदू आणि ती एका राजघराण्यातील होती. खूप कमी लोकांना माहित असेल की, सागरीकाचे वडील विजेंद्र घाटगे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते होते. झहीरने त्याच्या कुटुंबाला ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा दाखवला. घरातील सर्वांनाच सागरिका आणि तिचा अभिनय खूप आवडला. मग पुढे त्याने तिच्याशी लग्नाबद्दल घरच्यांना सांगितले. त्याच्या घरचे खूपच सहज तयार झाले.

इकडे सागरीकाने घरी सांगितले मात्र तिला खरी परवानगी तेव्हा मिळाली जेव्हा तिच्या घरच्यांना समजले की, झहीर खान खूप उत्तम मराठी बोलतो. दोघांनाही घरच्यांची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा करत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. सागरिका आणि झहीर यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले असून, ते खूपच आनंदी आणि मस्त त्यांचे जीवन जगत असतात. अनेकदा त्यांना बाहेर, कार्यक्रमांना स्पॉट केले जाते. याशिवाय सोशल मीडियावरही दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करताना दिसतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा