Saturday, April 20, 2024

चक्क चाहत्याने मुलाला रामायणातील ‘राम’ उर्फ अरुण गोविल यांच्या ठेवले पायाशी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

रामानंद सागर यांचा लोकप्रिय शो ‘रामायण’ प्रेक्षकांना खूप आवडले होते. या कार्यक्रमातील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा बनवली होती. इतकेच नाही, तर चाहते शोमधील पात्रांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर रील पात्रांच्या नावाने हाक मारू लागले. याच्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा एका मुलाखतीदरम्यान शोमध्ये ‘भगवान राम’ची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी शेअर केला होता.

खरं तर एका मुलाखतीत अभिनेता अरुण गोविल यांनी (Arun Govil ) गेलेल्या दिवसांची आठवण करून देणारा एक किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, “मी एकदा सेटवर टी-शर्ट घालून बसलो होतो. तेवढ्यात एक स्त्री तिच्या मांडीवर बाळ घेऊन आली आणि श्रीराम कुठे आहे? असे लोकांना विचारू लागली. सेटवरील लोकांनी त्या महिलेला माझ्याकडे पाठवले. आधी ती माझ्याकडे बघत राहिली, त्यानंतर तिने तिच्या मुलाला माझ्या पायाशी बसवले. ती मला सांगू लागली की, माझे मूल आजारी आहे, त्याला वाचवा.”

अरुण पुढे म्हणाले की, “हे सर्व पाहून मी खूप घाबरलो. मी तिला म्हणालो तू काय करतोस. यात मी काहीही करू शकत नाही. तू मूल घेऊन डॉक्टरकडे जा. मग मी त्या महिलेला काही पैसे दिले, त्यानंतर ती तेथून निघून गेली. ३ दिवसांनी ती बाई पुन्हा तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली. ते मूल निरोगी दिसत होते. मला नंतर समजले की, जर तुम्ही देवाकडे प्रामाणिक मनाने काहीतरी मागाल, तर ते नक्कीच मिळेल. जेव्हा ती स्त्री आजारी अवस्थेत तिच्या मुलाला माझ्याकडे घेऊन आली होती. त्यावेळी मी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.”

अरुण गोविल यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘पहेली’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले. ज्यामध्ये ‘सावन को आने दो’, ‘अय्याश’, ‘भूमी’, ‘हिम्मतवाला’, ‘दो आंखे बारह हाथ’ आणि ‘लव कुश’ यांचा समावेश आहे. त्याच वेळी रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही मालिका १९८७ मध्ये टेलिव्हिजनवर आली. ज्यामध्ये त्यांनी रामाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा