Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड ‘झूम झूम’ गाण्याची शूटिंग करताना पडता पडता वाचली दिशा पटानी, ‘भाईजान’ सलमान खानने वाचवला जीव; व्हिडिओ होतोय व्हायरल

‘झूम झूम’ गाण्याची शूटिंग करताना पडता पडता वाचली दिशा पटानी, ‘भाईजान’ सलमान खानने वाचवला जीव; व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो प्रत्येक गोष्टीत बॉलिवूड सुपरस्टार आहे. सलमानचा नवीन चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. परंतु या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्व रेकॉर्ड्स मोडत एक नवीन इतिहास रचला आहे. नुकतेच या चित्रपटातील एक नवीन गाणे ‘झूम झूम’चा व्हिडिओ समोर आला आहे. गाण्याला सलमान खान आणि दिशा पटानी यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान दिशाला पडता पडता वाचवताना दिसत आहे.

‘झूम झूम’ गाण्याचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान खान एक डान्स स्टेप करत असतो, तेवढ्यात अचानक दिशाचा तोल जातो आणि ती पडू लागते. मात्र, त्यावेळी सलमान खान तिला पडण्यापासून वाचवतो. यानंतर गाण्याची शूटिंग केली जाते.

‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटात नाही कोणताही सस्पेन्स- सलमान खान
‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाची तुलना वाँटेडसोबत केल्यानंतर ‘भाईजान’ सलमान खानने म्हटले की, “वाँटेडमध्ये माझ्या पोलीस आणि विनोद खन्ना यांचे माझे वडील होण्याचा सस्पेन्स होता. परंतु राधेमध्ये कोणताही सस्पेन्स नाही.”

“हा चित्रपट मनोरंजन, चांगले संगीत, शानदार ऍक्शन या सर्वांनी भरलेला आहे,” असेही पुढे बोलताना सलमान खान म्हणाला.

हा चित्रपट मागील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात आला.

विशेष म्हणजे हा चित्रपट भारतात जरी मोठ्या पडद्यावर रिलीझ केला गेला नसला, तरीही परदेशात मात्र चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीझ करण्यात आला आहे. जिथे त्याने पहिल्याच दिवशी धमाल केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल ४.३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

-सरोज खान यांच्या आठवणीत ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित झाली भावुक; म्हणाली…

-व्हिडिओ: घरी ईद साजरी होत असताना ‘भाईजान’ सलमान खान पोहोचला कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा