Monday, July 1, 2024

काय सांगता! सिद्धार्थ मल्होत्राऐवजी ‘शेरशाह’मध्ये ‘या’ अभिनेत्याला घेऊ इच्छित होता सलमान खान

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटातील कलाकार काही कारणांवरून बदलले जातात. यामध्ये अनेक नवीन येऊ पाहणाऱ्या कलाकारांचे मोठे नुकसान होते. योग्य कलाकार न निवडल्यामुळे बऱ्याच वेळा चांगली स्टोरी असूनही चित्रपट फ्लॉप होतात. अशात ‘शेरशाह’ चित्रपटामध्ये सलमान खानला त्याचा मेहुना आयुष शर्मा याला मुख्य भूमिकेत घ्यायचे होते.

कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली. या चित्रपटामध्ये शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची मुख्य भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने साकारली आहे. त्याने आपल्या अभिनयाने या भूमिकेला पुरेपुर यश दिले आहे. सिद्धार्थचा या चित्रपटामधील अभिनय सर्वांनाच आवडला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. चित्रपटामध्ये विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची भूमिका कियारा आडवाणी हिने निभावली आहे. (Actor Salman Khan Wanted To Get Ayush Sharma Casted In Shershaah In Place of Sidharth Malhotra)

‘शेरशाह’ चित्रपट यशाला गवसणी घालत असताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, “सलमान खान ‘शेरशाह’ या चित्रपटामध्ये त्याचा मेहुणा आयुष्य शर्माला घेऊ इच्छित होते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच सलमान खानने मला यासाठी संपर्क केला होता. सलमानला आयुषला या चित्रपटातून सर्वांसमोर आणायचे होते. परंतु बत्रा कुटुंबीयांना मी या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राचे नाव आधीच सांगितले होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करावा यासाठी आधीच बत्रा कुटुंबीयांबरोबर माझी बैठक झाली होती. त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे मी सलमानला हे सर्व समजावून सांगितले व त्याला देखील हे पटले.”

‘शरशाह’ चित्रपटांमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. बत्रा कुटुंबीयांनी देखील यावर प्रतिक्रिया देत ‘जसं घडलं होतं अगदी तसचं दाखवलं,” असे म्हटले आहे.

‘शेरशाह’ चित्रपट आणि त्यातील गाण्यांना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा