Sunday, July 14, 2024

तापसीने पुन्हा केला पॅपराझींचा सामना; यावेळी रागाने म्हणाली, ‘असे करू नका’

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तापसी तिच्या चित्रपटांमुळे आणि साैंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या पॅपराझींसाेबतच्या भांडणामुळे चर्चेत आहे. ती कधी पॅपराझींना फटकारताना तर कधी प्रेमाने बोलताना दिसते. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पॅपराझींवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती पॅपराझींना फोटो क्लिक करण्यास नकार देताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तापसी (taapsee pannu) एका इमारतीतून बाहेर पडते आणि पॅपराझी तिचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी तिच्याभोवती येऊ लागतात. पॅपराझींना हे करताना पाहून ती म्हणते, “अरे देवा, अरे देवा, माझ्यावर हल्ला करू नका मग तुम्ही म्हणाल की, ती किंचाळते.”

रागाच्या भरात तापसीने केले कराचे गेट बंद
यानंतर तापसी पन्नूने पॅपराझींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मग ती तिच्या गाडीकडे वळत चालत निघाली. पॅपराझी देखील तिच्या मागे गेला आणि ती तिच्या कारमध्ये बसायला गेली तेव्हा पॅपराझींनी तिला पुन्हा पोज देण्यास सांगितले. यावर ती चिडली आणि मान हलवत त्यांना वारंवार सांगितले की, “हे करू नकोस, असे करू नकोस.” असे बाेलत तापसीने कारचे गेट बंद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तापसीसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयुष्मान खुरानाच्या दिवाळी पार्टीत तापसी पॅपराझींसमोर दिसली होती. यावेळी गाडीतून उतरत्यावेळी पॅपराझीने तिला सांगितले की, “मॅडम आज ओरडू नका.” तापसीने जेव्हा हे ऐकले तेव्हा पहिल्यांदा ती हसली. यानंतर ती म्हणाली, “तुम्ही अशे कृत्ये करणार नसाल तर मी ओरडणार नाही.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! उंटांमध्ये शूटिंग करताना अमिताभ बच्चन झाले होते जखमी, बिग बींनी खुद्द केला खुलासा
ऋषी सुनक यांच्यावर बायोपिक बनवण्यासाठी जोरदार मागणी, अक्षय कुमारपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत ही नावे चर्चेत

हे देखील वाचा