Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नाद करा पण आमचा कुठं! फॅशनच्या बाबतीत मोठी बहीण सोनम कपूरलाही टक्कर देते शनाया कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची मुलं आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत बॉलिवूड गाजवत आहेत. तसेच, काही कलाकार हे पदार्पणाच्या टप्प्यावर उभे आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर होय. शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये झळकताना दिसणार आहे. सध्या ती आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही काळापूर्वी करण जोहरने घोषणा केली होती की, शनाया त्याच्या प्रोडक्शन हाऊससोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. याव्यतिरिक्त ती आपल्या फोटोंमुळेही कमालीची चर्चेत असते. आता तिच्या अशाच काही फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शनायाचे हॉट आणि बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. याबाबतीत ती आपली चुलत बहीण सोनम कपूर आणि अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. शनाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच आत्मविशासाने परिपूर्ण दिसत आहे. (Actor Sanjay Kapoor Daughter Shanaya Kapoor Wear Tube Top With Blazer And Pants Photos Viral)

शनायाने तिचे बरेच नवीन फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनाया फिक्कट गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने फिक्कट गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे, ज्यासोबत तिने फिक्कट गुलाबी रंगाचा ब्लेझर आणि पँट घातली आहे. या लूकसह शनायाने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिचं रूप खुललं आहे.

हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “सूट युवरसेल्फ.” शनायाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसोबतच तिची आई महीप कपूर, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि चुलत बहीण खुशी कपूर यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

शनायाच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

करणने २२ मार्च रोजी शनायाच्या बॉलिवूड प्रवासाच्या सुरुवातीची माहिती सोशल मीडिया पोस्टमार्फत दिली होती. करणने टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे, ज्यामध्ये शनाया कपूरही सामील झाली आहे. त्यांचे नाव डीसीए आहे. शनायाच्या फोटोशूटची छायाचित्रे शेअर करताना करणने लिहिले होते की, “DCA पथकात स्वागत आहे, शनाया.”

विशेष म्हणजे, चित्रपटात झळकण्यापूर्वी शनाया एका कमर्शियल जाहिरातीतही दिसली आहे. अशात आता, शनायाला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा