Tuesday, May 28, 2024

प्रसिद्ध अभिनेत्याचं मोडलं हाड, हॉस्पिटलमधून शेअर केला वाईट अवस्थेतील फोटो

पात्रांमध्ये जिवंतपणा आणत चाहत्यांना पोट धरून हसवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते संजय मिश्रा यांचा समावेश होतो. त्यांनी शेकडो हिंदी सिनेमात काम केले आहे. त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी फक्त एकच एक पात्र न साकारता, वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या आहेत. रुपेरी पडद्यावर त्यांच्या अभिनयाला तोड नाहीच, पण खऱ्या आयुष्यातही ते भल्याभल्यांवर उजवे ठरतात. त्यांच्या विनोदबुद्धीने ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही ते अशाच काही कारणामुळे चर्चेत आले आहेत.

खरं तर अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) हे सध्या वाईट काळातून जात आहेत. त्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. मात्र, त्यांनी विनोदबुद्धीचा वापर करत अनोख्या अंदाजात याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

मिश्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी हेअरलाईन फ्रॅक्चरची माहिती देत एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या खांद्याला आधार देणारी एक पट्टी लागली आहे. या पोस्टवरून समजते की, त्यांचा हा फोटो रुग्णालयात काढण्यात आला आहे.

अशा त्रासदायक काळातही त्यांनी याची माहिती देताना त्यांच्या विनोदबुद्धीचा पुरेपूर वापर केला आहे. त्यांनी आपल्या फोटोसोबत फ्रॅक्चरबद्दल लिहिले की, “एक टूटा फुटा ऍक्टर… हेअरलाईन फ्रॅक्चर… जेव्हा स्वत:च्या वेदना जाणवल्या, तेव्हा इतरांच्या वेदनाही जावणली. त्यामुळे म्हणतो, जय हनुमान.”

त्यांच्या या फोटोच्या मागे “सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत, सर्वांचे जीवन सुखी होवो आणि कोणालाही दुःखाचा सामना करावा लागू नये,” असे लिहिले आहे.

संजय मिश्रांच्या या ट्वीटवर चाहते त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही कमेंट करत त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी संजय मिश्रांबद्दल लिहिले की, “विश्रांती घ्या भैय्या. लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.”

संजय मिश्रांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ते नुकतेच कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्या ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमात झळकले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता ते कार्तिकच्याच ‘फ्रेडी’ या आगामी सिनेमात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
तब्बल आठ वर्षांनी ‘चला हवा येऊ द्या’ टीमसाठी मिळाली आनंदाची बातमी, श्रेया बुगडेने केला खुलासा
रणवीर सिंगचा पाय आणखी खोलात! मनसेकडून गुन्हा दाखल, फोटो तात्काळ हटवण्याचा दिला इशारा
शेवटी सापडला! रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचा पहिला खुलासा, म्हणाला ‘तो २ तास उघडाच…’

हे देखील वाचा