Tuesday, May 21, 2024

रणवीर सिंगचा पाय आणखी खोलात! मनसेकडून गुन्हा दाखल, फोटो तात्काळ हटवण्याचा दिला इशारा

सध्या मनोरंजन जगतात सर्वत्र अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वीच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो अभिनेत्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केले होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यावर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोकांनी रणवीरच्या या फोटोशूटला समर्थन दिले आहे तर अनेकांनी त्यावर जोरदार टिकाही केला आहे. आता रणवीरच्या या फोटोंवर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 

रणवीर सिंग हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टिकाही होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मनसेनेही रणवीर सिंगच्या फोटोंप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शारिरिक पुणे सेनेचे अध्यक्ष निलेश काळे यांनी रणवीर सिंगच्या या फोटोशूटमुळे हिंदू संस्कृतीचा अपमान होत असून स्रियांना फोटो पाहताना अपमान वाटतो तसेच लहान मुलांच्याही मनावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप पुणे मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळेच रणवीर सिंगवर ३५४, ५०९, ६७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर हे आक्षेपार्ह फोटो लवकरात लवकर हटवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर जोरदार टिका होत असली तरी अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. परंतु मनसेच्या या तक्रारीमुळे रणवीरच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हेही वाचा –

काय सांगता! ‘टाईमपास ३’ च्या सेटवर ऋता दुर्गुळेचा झालेला अपमान? कलाकारांनीच सांगितला संपूर्ण किस्सा

शेवटी सापडला! रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचा पहिला खुलासा, म्हणाला ‘तो २ तास उघडाच…’

इंजिनियरिंगचा अभ्यास करणारी क्रिती सेनन कशी बनली बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री? वाचा तिचा सिनेप्रवास

हे देखील वाचा