Friday, November 22, 2024
Home मराठी ‘चल निघं इथून…’ अभिनेता संतोष जुवेकरचा शाहरुखच्या कंपनीत ‘असा’ झाला होता अपमान

‘चल निघं इथून…’ अभिनेता संतोष जुवेकरचा शाहरुखच्या कंपनीत ‘असा’ झाला होता अपमान

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही नेहमीच प्रसिद्ध असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध पोस्ट करत त्यांचे अनुभव मांडत असतात. यामध्ये लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरचे (Santosh Juvekar) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या संतोष जुवेकरची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा हिंदी सिनेसृष्टीमधील प्रवास त्याने मांडला आहे. काय आहे संतोषची ही व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. यावरुन तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असतो. सध्या संतोष जुवेकरची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हिंदी सिनेसृष्टीतील त्याचा प्रवास सांगत १९९८चा एक प्रसंग सांगितला आहे. ज्यामध्ये त्याने अपमान केल्याचे सांगितले आहे.

या पोस्टमध्ये संतोष जुवेकर म्हणतो की, “वर्ष -१९९८. ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला production office). मी office च्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का कुणाला भेटता येईल का म्हणुन gate वर जाऊन विचारतो एका security gard ला तर तो मला ओरडून ” चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो. आणि मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो ” रुक तू. एकदिन तुमलोगही gate खोलेगा मेरेलिये ” असं बोलून त्या bulding जवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो. पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला. मग काही वर्षांनतर मला एक call येतो “hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film, if possible plz come to the office.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

या घटनेनंतर २०२० मधील घटनेचा दाखला देत संतोष जुवेकर म्हणतो की, “वर्ष -२०२० ठिकाण – खार – सांताक्रूझ.
Redchillis entertainment pvt ltd (शाहरुख खान production office). मी gate वर पोहोचतो माझ्या गाडीतून, गाडी gate च्या बाहेर parking साठी जागा शोधतोय तेव्हढ्यात call येतो ” hi sir where r u? We r waiting for u.” मी त्यांना सांगतो की मी आलोय खाली आहे parking साठी जागा शोधतोय तर तो मला म्हणतो अरे sir plz park inside wait m sending someone to assist u. आणि काही मिनटात office च gate उघडल जात security धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो “sir plz आईये.” बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स”

“ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप मरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो ” भाई य्ये मेरा शेर. ज्जा जिले अपनी जिंदगी.” शारुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य. “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.” आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा. बाकी मला अजून मोठ्ठ करायला तुम्ही सगळे आहातच आवडलं तर शाब्बास म्हाना आणि नाही आवडलं तर कान पिळा पन हानू नका.”

सध्या अभिनेता संतोष जुवेकरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा –

खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी

वयाच्या साठीत आमिरच्या बहिणीने ओलांडल्या मर्यादा, आई अन् पोरा-बाळांसमोरच पतीसोबत केले लिपलॉक

‘मी रणवीरला कंपनी देतेय, पण तुम्हाला माझा *** दिसणार नाही’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट व्हायरल

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा