Thursday, April 25, 2024

वयाच्या साठीत आमिरच्या बहिणीने ओलांडल्या मर्यादा, आई अन् पोरा-बाळांसमोरच पतीसोबत केले लिपलॉक

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. आमिरने आतापर्यंत जवळपास ५२ सिनेमात काम केले आहे. यादरम्यान त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. आता तो त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, तरीही त्याने आपल्या कुटुंबासाठी खास वेळ काढला. त्याची बहीण निखत हेगडे यांचा ६०वा वाढदिवस होता. त्यामुळे याच्या सेलिब्रेशनमध्ये आमिर त्याच्या मुलांसोबत म्हणजे, आयरा खान आणि मुलगा आझाद राव खान यांच्यासोबत सामील झाला होता. यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात आमिरची बहीण खूपच हॉट स्ट्रॅपी ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच, ती लिपलॉकही करतेय.

आमिर खानच्या बहिणीने ६०वा वाढदिवस केला साजरा
आमिर खान (Aamir Khan) याची बहीण निखत हेगडे (Nikhat Hegde) यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिर त्याच्या मुलांसोबत निखत यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य सामील झाले होते. निखत यांनी स्वत: त्यांच्या पार्टीतील एक व्हिडिओ क्लिप त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, त्यांच्या टेबलवर अनेक केक ठेवले आहेत. तसेच, शेजारी आई बसली आहे आणि आमिरही शेजारीच उभा आहे.

आई आणि भावासमोर निखत यांनी पतीला केले लिपलॉक
व्हिडिओमध्ये दिसते की, केक कापल्यानंतर निखत त्यांच्या आईला केक चारतात. त्यानंतर त्यांच्या मुलीवर प्रेम व्यक्त करतात. मुलीप्रती प्रेम व्यक्त करतानाच, भर पार्टीमध्ये आई आणि भावासमोर निखत त्यांच्या पतीसोबत लिपलॉक (Nikhat Lip Lock Video) करताना दिसतात. आमिरही तिथे बसलेला असतो आणि यानंतर तो त्यांना केक चारतो. तसेच, निखत सर्वांना धन्यवाद देताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhat Hegde (@nikhat3628)

स्ट्रॅपी ड्रेसमध्ये साजरा केला वाढदिवस
या व्हिडिओत दिसते की, आमिर खान याची बहीण निखत यांनी एक मरून रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा ड्रेस तसा पाहिला, तर पूर्ण आहे. मात्र, ड्रेसमध्ये एका बाजूने स्ट्रॅपी शोल्डर स्लीव्ह आहे. निखत यांचे केस बांधलेले आहेत आणि ड्रेससोबतच त्यांनी मोठे कानातलेही घातले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
उर्फीने फक्त जीन्स घालून केले होते फोटोशूट, व्हायरल व्हिडिओत अभिनेत्रीने केसांनी झाकले शरीर
‘मी रणवीरला कंपनी देतेय, पण तुम्हाला माझा *** दिसणार नाही’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट व्हायरल
‘लय बकवास गातो, परत गायलास तर बघच…’, म्हणत प्रसिद्ध गायकाला पोलिसांकडून अटक, ८ तास केली चौकशी

हे देखील वाचा