अभिनेता संतोष जुवेकर (Santosh juvekar) मागील २० वर्षांपासून मराठी चित्रपटांत कार्यरत आहेत. मोरया, झेंडा, कांदे पोहे, फक्त लढ म्हणा यांसारख्या सिनेमांतून तो घराघरात पोचला आहे. अनेक मालिकांमध्ये काम केल्याने संतोषचा चाहता वर्ग मोठा झाला आहे. मराठी सह संतोषने इतर भाषांमधील चित्रपट आणि वेब सिरीज मध्येही कामे केली आहेत. नुकतीच संतोषने ईसापनीती या युट्युब चॅनलला एक मुलाखत दिली आहे, ज्यात अनेक विषयांवर तो बोलला.
जाती धर्मावर केला जाणारा भेदभाव या विषयावर संतोष यावेळी बोलला. “मी जर एखाद्या मुस्लीम मित्राच्या घरी गेली आणि पुरणपोळी मागितली तर तो देईल. जर तो माझ्या घरी आला आणि त्याने बिर्याणी मागीतली तर मीही देईन. जर एखाद्या कॅथलिक मित्राच्या घरी गेलो आणि त्याला साबुदाण्याची लापशी मागितली तर तो माझ्यासाठी ती बनवेल. जर तो माझ्या घरी आला तर मी त्याच्यासाठी केक बनवेल. मला वाटतं कि जात धर्म सोडायला पाहिजे. महाराजांसारखी दाढी ठेवली, चंद्रकोर काढली आणि कानात बाळी घातली म्हणजे तुम्ही महाराचांचे मावळे होत नाही. त्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणा.” संतोषची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे.
संतोष सध्या विकी कौशलच्या आगामी छावा या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करीत आहेत. या सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंधना ही येसुबाईंच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. संतोष सध्या टीव्ही वर इंद्रायणी या मालिकेत दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
निक्की तांबोळीने काढली वर्षा उसगावकरांची अक्कल, त्या एका चुकीमुळे घडलं महाभारत
“आजकाल ही सौंदर्याची व्याख्याच झाली आहे”, राजकुमार रावच्या प्लस्टीक सर्जरी बाबत इमरान हाश्मीने केले वक्तव्य