Wednesday, March 4, 2026
Home अन्य सपना चौधरीची धमाल कायम! आईच्या प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या ‘लोरी’ने पार केला ८६ लाख व्ह्यूजचा टप्पा

सपना चौधरीची धमाल कायम! आईच्या प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या ‘लोरी’ने पार केला ८६ लाख व्ह्यूजचा टप्पा

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि ‘बिग बॉस’मध्ये येऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सपना चौधरीचे चाहते जगभरात आहेत. तिचे ऊर्जेने भरलेले जबरदस्त डान्स प्रेक्षकांना वेड लावतात. देसी क्वीनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सपना चौधरीचा डान्स एकदा पाहिल्यानंतर तो आयुष्यभर विसरणे कठीण आहे.

सपना चौधरीची गाणी यूट्यूबवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. ज्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम देखील मिळते. तिच्या गाण्यांच्या व्हिडिओंवर लाखो व्ह्यूजसोबत, लाईक्स आणि प्रतिक्रिया सुद्धा मिळतात. आजकाल, तिचे असेच एक धमाकेदार आणि सुंदर गाणे ‘लोरी’ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. गाण्याचे बोल देखील खूप छान आहेत, ज्याला चाहते खूप पसंती देत आहेत. यासह, त्याचे संगीत देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

गाण्यात सपना चौधरी आईच्या भूमिकेत दिसत आहे. ती तिच्या मुलावर खूप प्रेम करत असते. गाण्यात सपना चौधरीच्या देसी स्टाईलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सपना चौधरीच्या या गाण्याच्या व्हिडिओवर आतापर्यंत ८६,५१३,९६९ व्ह्यूज तसेच लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आणि चाहते गाण्याचे प्रचंड कौतुक करत आहेत. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, सिमरन बुमराहने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. गाण्याचे दमदार बोल संजीत सरोहा यांनी लिहिले आहेत. तर गाण्याचे संगीत मोहन पांचाळ यांनी दिले आहे.

 

या गाण्यात सपना चौधरी आणि संजीत सरोहा, वंशिका दिसत आहेत. या गाण्यात पाहिले जाऊ शकते की, आई घरातील इतर कामांसह आपल्या मुलाची काळजी कशी घेते आणि प्रेमाने ‘लोरी’ गाऊन त्याला झोपवते. सपना चौधरीचे गाणे यूट्यूबवर व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिची अनेक गाणी यूट्यूबवर पाहायला मिळतील. ज्यांना प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा