Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘पठाण‘ काही तासांतच रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. अशातच आपल्या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखने पठाणबाबत आपली रणनीती बदलली आणि यावेळी केवळ सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचे प्रमोशन केले.

पठाणच्या फर्स्ट लूकपासून ट्रेलर रिलीज होईपर्यंत शाहरुख (shah rukh khan) नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत चित्रपटासंदर्भातील कोणत्याही पब्लिक इवेंट अटेंड केलेला नाही. आता रिलीजच्या काही तास आधी शाहरुखने चाहत्यांसह आस्क मी सेशन केले, ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

शाहरुख खानच्या आस्क मी सेशनदरम्यान एका चाहत्याने अभिनेत्याला हनीमूनबाबत एक भन्नाट प्रश्न विचारला. ट्विटरवर प्रश्न करत चाहत्याने अभिनेत्याला विचारले, “सर माझे गेल्या आठवड्यात लग्न झाले आहे… मी आधी हनिमूनला जावे की, पठाणला बघावे??”

shahrukh khan

या चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने हुशारीने उत्तर दिले आणि म्हणाला, “बेटा, एक आठवडा झाला, अजून हनिमून झालेला नाही. आता तू तुझ्या बायकोसोबत पठाण बघ आणि नंतर हनिमूनला जा.”

दीपिका पदुकोणबद्दल बोलताना किंग खान म्हणाला, “आम्हाला पठाणसाठी एका अशा अभिनेत्रीची गरज होती जी बेशरम रंग सारखे गाण्याचे सीन करू शकेल आणि आवश्यक असेल तेव्हा अॅक्शन सीन करू शकेल इतकंच नाहीतर एका मुलाला उचलून देखील फेकू शकेल, जाे तिच्यावर मागून हल्ला करण्याचा प्रयत्न करताे. हे सर्व गुण दीपिकासारख्या अभिनेत्रीमध्येच मिळू शकत हाेते. ती चित्रपटात माझ्यापेक्षा टफ दिसत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पठाणमध्ये दीपिका आणि शाहरुख चौथ्यांदा एकत्र दिसणार आहेत. दोघांनी यापूर्वी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.(actor shah rukh khan gave savage reply to fans asking honeymoon question during asksr session)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत जाेडाे यात्रेत उर्मिलाचा सहभाग, राहुल गांधीचा हात हातात घेऊन चालली अभिनेत्री

‘डान्स आणि एक्टिंग येत नाही’ म्हणत नेटकऱ्यांनी सई ताम्हाणकरचा डान्स पाहून केले ट्रोल

हे देखील वाचा