बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये सुपरस्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतच्या नावाचाही समावेश होतो. ते आपल्या कामाव्यतिरिक्त एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता त्यांचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात ते एकमेकांसोबत रोमँटिक झाल्याचे दिसत आहे.
मीरा राजपूतने (Mira Rajput) हा व्हिडिओ मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेअर केला होता. मात्र, आता व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हिडिओमार्फत मीराने सांगितले होते की, तिच्या डोक्यात काय काय सुरू असतं.
मीरा राजपूतसोबत लिपलॉक करताना दिसला शाहिद कपूर
व्हिडिओत मीराच्या आयुष्यातील वेगवेगळे क्षणाचे फोटो दिसत आहेत, ज्यातील एका फोटोत शाहिद कपूर (Shahid Kapoor) मीराला लिपलॉक करताना दिसत आहे. फोटोवरून स्पष्ट होतं की, हे जोडपे किती रोमँटिक आहे. याव्यतिरिक्त मीराने आपल्या ट्रिपपासून ते कुटुंबासोबत घालवलेले खास क्षणही या व्हिडिओत दाखवले आहेत.
मीराने आयुष्यातील खास क्षण केले शेअर
व्हिडिओतून मीरा राजपूत व्यक्त करत आहे की, तिला खाण्यापिण्याचीही खूप आवड आहे. यावर शाहिदने सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंट करत लिहिले की, “त्यामध्ये स्वत:ला पाहून खूप आनंद झाला.” चाहत्यांव्यतिरिक्त इतर कलाकारांनीही कमेंट करून या जोडप्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.
शाहिद आणि मीराच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर या जोडप्याने ७ जुलै, २०१५ रोजी लग्नगाठ बांधली होती. हे जोडपे आता २ मुलांचे आई-वडील झाले आहेत. मीरा ही अभिनेत्री नसली, तरीही ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता खूपच जास्त आहे.
चाहत्यांना आहे शाहिदच्या ‘जर्सी’ची उत्सुकता
शाहिदच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याच्या ‘जर्सी’ या आगामी सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. हा सिनेमा ३१ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. शाहिद शेवटचा सन २०१९ मध्ये आलेल्या ‘कबीर सिंग’ या सिनेमात झळकला होता.
हेही वाचा-