शाहिद कपूर नाही, तर ‘हा’ आहे मीरा राजपूतचं पहिलं प्रेम; अभिनेत्याचा खुलासा


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मात्र आता तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे भलताच चर्चेत आला आहे. शाहिदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी मीरा राजपूतबद्दल (Mira Rajput) असे काही खुलासे केले आहेत. हे कळल्यानंतर चाहते शाहिदला एकच प्रश्न विचारत आहेत, मीराचे पहिले प्रेम कोण आहे? चाहत्यांच्या या प्रश्नाचा काही अर्थ काढण्यापूर्वी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजावून सांगतो…

पंजाबमध्ये एन्जॉय करतायेत शाहिद अन् मीरा
शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. सध्या शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत मुंबईत नाही तर पंजाबमध्ये थंडीचा हा रोमँटिक सीझन एन्जॉय करत आहे. शाहिदने नुकताच पंजाबमधील पत्नीसोबतचा ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ शेअर केला आहे. (shahid kapoor reveals secret of his wife mira rajpoot first love)

पत्नी मीराबद्दल शाहिद कपूरचा खुलासा
एक ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ शेअर करत शाहिदने पत्नी मीराबद्दलचे एक गुपितही उघड केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहिद आणि मीरा नेहमीप्रमाणेच खूप स्टायलिश दिसत आहेत. दोघांनी जॅकेट घातलेले आहेत. व्हिडिओचे बॅकग्राऊंड पाहता दोघेही सकाळी जॉगिंगसाठी बाहेर गेल्याचे दिसत आहे.

रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
शाहिदने मीरासोबतचा व्हिडिओ शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमध्ये शाहिद म्हणतोय की, “मी मीराचे पहिले प्रेम नाही. तर ती ज्याच्याकडे पाहत आहे ते आहे. पण तिचं दुसरं प्रेम असूनही मला खूप आनंद आहे. काय करू, प्रेम असंच असतं.” शाहिदच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मीराने लिहिले की, “असं नाहीये, तू माझं पहिलं प्रेम आहेस.”

शाहिदचे चित्रपट
शाहिद आणि मीराचा हा ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये, ‘जर्सी’ चित्रपटातील ‘बिन तेरे क्या यारा मेरा, साहिबा तो मैं मिर्झा तेरा’ हे गाणे वाजत आहे, जे व्हिडिओमध्ये आणखी रोमँटिक बनवत आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!