×

मीरा राजपूतने शेअर केला शाहिदसोबतचा आतापर्यंतचा सर्वात रोमँटिक फोटो, आरशासमोर दिसले लिपलॉक करताना

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र त्याची पत्नी मीरा राजपूत भलेही चित्रपटांमध्ये काम करत नसेल, पण तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीराला इंस्टाग्रामवर ३.३ मिलियन युजर फॉलो करतात. त्यामुळेच तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तसे पाहिले, तर मीरा (Mira Rajput) स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना आवडत असलेल्या अनेक मनोरंजक पोस्ट शेअर करत असते. आता नुकताच मीराने आपल्या पतीसोबतचा असा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहून तुमच्या तोंडून उफ्फ काय फोटो आहे असे शब्द नक्कीच निघतील. या फोटोत मीरा शाहिदसोबत (Shahid Kapoor) फुल ऑन रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. मीराने याआधी शाहिदसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोमध्ये काहीतरी खास आहे… खास गोष्ट म्हणजे दोघेही लिपलॉक करताना दिसत आहेत.

फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे या फोटोमध्ये मीरा आणि शाहिदचे चेहरे दिसत नाहीत, फक्त दोघांची डोके दिसत आहेत. ज्या पद्धतीने हा फोटो काढण्यात आला आहे, त्यावरून स्पष्ट होते की, तिच्या समोर एक आरसा आहे. ज्यामध्ये मीराने लिपलॉक करताना फोटो क्लिक केला आहे. हा फोटो शेअर करत मीराने “संडे बिंजे” या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चाहतेही त्यांच्या या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत आणि या जोडप्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मीराने रोमँटिक फोटो शेअर करून शाहिदला स्पेशल फील करून देण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन्ही कलाकार एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शाहिद लवकरच ‘जर्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post