अभिनेता शाहिद कपूरने आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. त्याचे चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. त्याच्या आगामी चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. मात्र, एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याला आपला एक चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शकांकडे आग्रह करावा लागला होता. तो चित्रपट इतर कोणताही नसून ‘जर्सी’ आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शाहिदने मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. 25 फेब्रुवारी 1981 रोजी शाहिद कपुर याचा जन्म झाला. या निमित्ताने त्याच्या चित्रपटाविषयी रंजक किस्से जाणुन घेऊ या…
शाहिदने खुलासा करत सांगितले की, ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या अफाट यशानंतर तो आपला ‘जर्सी’ हा चित्रपट घेऊन अनेक चित्रपट दिग्दर्शकांकडे गेला होता. तसेच, त्यांना हा चित्रपट बनवण्याचा आग्रह केला होता. मात्र, कुणीही त्याला गांभीर्याने घेतले नाही. (Actor Shahid Kapoor On Kabir Singh Release At Jersey Movie Trailer Launch)
‘कबीर सिंग’मुळे पहिल्यांदाच 200 – 250 कोटी क्लबचा भाग बनला होता शाहिद कपूर
शाहिद म्हणाला की, “‘कबीर सिंग’ प्रदर्शित झाल्यानंतर, मी भिकाऱ्यासारखा सगळ्यांकडे गेलो. हे 200-250 कोटींचे चित्रपट बनवणाऱ्या सर्व लोकांकडे मी गेलो. मी या क्लबचा कधीच भाग राहिलो नाही, त्यामुळे माझ्यासाठी ते पूर्णपणे नवीन होते. 15-16 वर्षे इंडस्ट्रीत घालवल्यानंतर, एवढी मोठी कमाई कधीच झाली नव्हती, त्यामुळे शेवटी जेव्हा हे घडले, तेव्हा मला माहित नव्हते की मी कुठे जायचे आहे. हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते.”
‘माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे’
“तुम्ही म्हणू शकता की, कबीर सिंगच्या आधी मला ‘जर्सी’ ऑफर करण्यात आली, तेव्हा मी त्याला नाही म्हणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे माझ्यासोबत काम करण्यासाठी आणि माझी वाट पाहण्यासाठी, मी याचे श्रेय चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम यांना देतो. मी सांगू शकतो की, हा चित्रपट माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे,” असेही ‘कबीर सिंग’बाबत बोलताना शाहिद म्हणाला.
चित्रपट पाहिल्यानंतर जोरजोरात रडल होता शाहिद कपूर
“मी या चित्रपटाची कथा ऐकली आणि ती ऐकून मला खूप आनंद झाला. ‘कबीर सिंग’ प्रदर्शित होण्याच्या 2 आठवडे आधी मी हा चित्रपट पाहिला आणि तो पाहून मला अश्रू अनावर झाले. मीरा आणि माझ्या मॅनेजरसोबत मी तो पाहिला आणि मला पाहून ते दोघेही थक्क झाले.”
मृणाल ठाकूर आणि पंकज कपूरही आहेत महत्त्वाच्या भूमिकेत
गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित ‘जर्सी’ या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात मृणाल त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सोबतच शाहिदचे वडील पंकज कपूर चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. एक खेळाडू क्रिकेट सोडून आपल्या मुलाची जर्सी विकत घेण्यासाठी मैदानात कसा परततो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी
200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच