Tuesday, June 25, 2024

200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच

सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. अशात अचानक अधिकाऱ्यांनी मंडोली कारागृहातील कोठडीत छापा टाकला. छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना सुकेशकडून अनेक चैनीच्या वस्तू सापडल्यात. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तांनुसार, सुकेश (sukesh chandrashekhar) त्याच्या सेलमध्ये एकटाच होता, तेव्हा अधिकाऱ्यांचे पथक अचानक घुसले आणि त्याच्या सेलमधील प्रत्येक वस्तूची पडताळणी करु लागले. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी सुकेशच्या सेलमधून दीड लाख रुपयांची चप्पल, 80 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या 3 जीन्स जप्त केल्या आहेत. मंडोली कारागृहाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तुरुंग प्राधिकरण चौकशी करेल आणि ज्या व्यक्तीने सुकेश चंद्रशेखरच्या सेलमधील सीसीटीव्ही फुटेज लीक केले त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.”

सुकेशवर मालविंदर सिंग यांच्या पत्नीची फसवणूक केल्याचा आराेप
सुकेश चंद्रशेखर याला 16 फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. कारण, माजी रेलिगेअर प्रवर्तक मालविंदर सिंग यांच्या पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. सुकेशने मालविंद्रर सिंग यांच्या पत्नीला स्वतःची ओळख केंद्रिय ग्रृह आणि कायदा सचिव, अशी करून दिली होती.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त सुकेशने जॅकलिनला दिल्या शुभेच्छा
सुकेशवर फोर्टिसच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नीकडून 217 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो अलीकडेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqueline fernandez) हिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी चर्चेत होता. सुरक्षा कर्मचारी त्याला विशेष एनआयए कोर्टातून बाहेर काढत असताना पत्रकारांशी बोलताना त्याने जॅकलिनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. जेव्हा सुकेशला पत्रकारांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “मी तिला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.”(bollywood sukesh chandrashekhar cell in mandoli jail raided expensive slippers and jeans recovered cctv footage gone video viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! कंगना रणौत दिसते मधुबाला सारखी? हे आम्ही नाही तर खुद्द पंगा क्वीनच म्हणते, आता तुम्हीच पाहा आणि ठरवा

HBD | वडिलांना किस करणे असो किंवा १६ व्या वर्षी दारू पिण्याची सवय असो, नेहमीच वादात अडकली पूजा भट्ट

हे देखील वाचा