प्रसिद्ध आणि वादग्रस्त टॉक शो ‘कॉफी विथ करण‘मध्ये प्रसिद्ध कलाकार आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावत असतात. या शोदरम्यान होस्ट करण जोहर विचित्र प्रश्न विचारून कलाकारांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी काही प्रश्न असे असतात, ज्याचे उत्तर देणे काही कलाकार टाळतात, तर काहीजण बेधडकपणे देतात. असेच बेधडक आणि मनमोकळे उत्तर अभिनेता शाहिद कपूर याने या शोदरम्यान दिले होते, जे ऐकून अभिनेत्री कियारा आडवाणी हीदेखील लाजून लाल झाली होती. खरं तर, शाहिदने त्याच्या शरीराचा सर्वात सेक्सी पार्टचा खुलासा केला होता.
‘कॉफी विथ करण’मध्ये घसरली शाहिदची जीभ
तसं पाहिलं, तर ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शोमध्ये जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये करण जोहर (Karan Johar) याच्यासोबत पाहुणे कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करतात. दुसरीकडे, या शोमधील व्हायरल होत असलेल्या प्रोमो व्हिडिओत शाहिद कपूर (Shahid Kapoor) याला विचारले जाते की, त्याच्यामते त्याच्या शरीराचा सर्वात सेक्सी भाग कोणता आहे?
शाहिदचे उत्तर
यावर शाहिद कोणताही विचार न करता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो की, तो भाग आता कॅमेऱ्यावर दिसत नाहीये. आता यावरून स्पष्ट होते की, तो यावेळी त्याच्या खासगी पार्टविषयी बोलत आहे. असे असले, यावेळी शाहिदचे उत्तर ऐकून शेजारीच बसलेले करण आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) हेदेखील हैराण होतात.
View this post on Instagram
या सिनेमात झळकणार शाहिद आणि कियारा
शाहिद आणि कियाराच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर कियाराचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याव्यतिरिक्त कियाराच्या ताफ्यात ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमाही आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन झळकणार आहे.
दुसरीकडे, शाहिदच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमात डायना पँटीसोबत दिसणार आहे. यासोबत तो दिनेश विजन यांच्या नाव निश्चित नसलेल्या एका सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो क्रिती सेनन हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त शाहिदच्या खात्यात ‘बुल’ हा सिनेमाही आहे. (actor shahid kapoor panis is sexiest private body part actor answer kiara advani shocked read here)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वय फक्त आकडा! आजीबाईंनी 93व्या वर्षी लावले ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ गाण्यावर ठुमके, पाहा व्हिडिओ
‘अरे तुमच्या ताटात जेवण नाहीये…’, शाहरुखच्या ‘पठाण’ला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली प्रसिद्ध अभिनेत्री