Friday, April 19, 2024

करण जोहरने मलायकला विचारले सेक्स टॉईज बद्दल प्रश्न, अभिनेत्री लाजून झाली लाल

मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’मुळे चर्चेत आहे. या शोद्वारे अभिनेत्रीने डिजिटल डेब्यू केला आहे. या शोच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना तिचे आयुष्य जवळून जाणून घेण्याची संधी देत ​​आहे. मलायका या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. मागील एपिसोड्समध्ये अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत, ज्यामध्ये ती रडताना, हसताना दिसली होती. मात्र, आगामी एपिसोडमध्ये मलायका चांगलीच लाजताना दिसत आहे. काय घडले असे की, अभिनेत्री इतकी लाजली? चाल जाणून घेऊया…

आगामी एपिसोडमध्ये करण जोहर (karan johar) मलायका (malaika arora) हिच्या शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार आहे. करण जोहर आणि मलायका यांची मैत्री खूप जुनी आहे आणि दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य एकमेकांसोबत सहज शेअर करतात. अशा परिस्थितीत आगामी एपिसोडमध्ये करण जोहर मलायकाला अनेक प्रकारे प्रश्न विचारणार आहे, पण निर्मात्याने अचानक अभिनेत्रीला तिच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारला, जे ऐकून मलायका लाजली. संभाषणादरम्यान करण जोहरने मलायका अरोराला बेडरूम सीक्रेट्सवर प्रश्न केला.

ताज्या एपिसोडमध्ये, करण जोहर मलायकाला विचारताे की, “मलायका आणि अर्जुन कपूर बेडरूममध्ये एक्सपेरिमेंट करतात का?” हा प्रश्न येताच मलायका अरोराचा चेहरा लाजून लाल हाेताे. करण विचारताे, “मग तुला अर्जुनसोबत फिरायला आवडते का? एक्सपेरिमेंट करायला आवडते का?” यावर मलायका करणला शो सोडण्यास सांगून पर्सनल लाइफ वरील संभाषणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, परंतु ती तसे करण्यात अपयशी ठरते. करणने मलायकाला पुढे विचारले की, “सेक्स टॉय्स आहेत का?” करणच्या या प्रश्नावर अभिनेत्रीला प्रतिसाद देणे योग्य वाटले नाही आणि ती शांत बसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

यासोबतच करणने त्याच्या बेडरूमची गोष्टही शेअर केली. करण जोहर म्हणाला, “मी एकदा रोल प्ले करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो ड्रेस मला शोभला नाही. तो पोलीस होता. मला सिंघम व्हायचे होते. करणचे बोलणे ऐकून मलायकाचा आवाज येणे बंद झालं होतं.

यासोबतच करण जोहरने मलायकाला आणि अर्जुनच्या नात्याबद्दलही खुलासा केला.(karan johar asked malaika arora about her bedroom secrets with arjun kapoor)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरे व्वा! चिरंजीवी लवकरच बनणार आजोबा, लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरणच्या घरी हलणार पाळणा

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अमृताने दाखवला हॉट अंदाज, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा