Tuesday, July 23, 2024

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मोनोकनीतील लूकने सोशल मीडियावर लावली आग

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. जान्हवीच्या चाहत्यांमध्ये तिचा अभिनयच नाही, तर तिच्या सौंदर्याचाही बोलबाला आहे. सोशल मीडियावर सक्रिय जान्हवी तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जान्हवी तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून सोशल मीडियावर राडा घातला आहे.

अलीकडेच जान्हवीने (Janhvi Kapoor) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड ब्लॅक बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिचे चाहतेही अभिनेत्रीच्या या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. जान्हवी ब्लॅक मोनोकनीमध्ये स्विमिंगचा आनंद घेत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी किलर स्टाईलमध्ये पोज देत आहे. तिचे हे फोटोही प्रचंड व्हायरल होत आहेत. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांना खूश करत आहे. चाहत्यांनीही तिच्या फोटोंचे कौतुक केले आहे.

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये ती खूपच फ्रेश दिसत आहे. अभिनेत्रीचे एक्स्प्रेशन आणि लूक अप्रतिम दिसत आहेत. जान्हवीचे हे फोटो तिच्या मित्रांसोबतच्या सुट्टीतील आहेत. ज्यामध्ये ती सुपर सिझलिंग अवतारात दिसत आहे. फोटोंमध्ये ती तलावाजवळ बसून विश्रांतीचे क्षण घालवताना दिसत आहे. जान्हवी आजच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून, तिला जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा