दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. सध्या ‘पुष्पा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोलबला आहे. अल्लू सध्या त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील शानदार अभिनयामुळे खूप चर्चेत आहे. तर त्याची पत्नी स्नेहा रेड्डीचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ तिच्या गोवा डायरीतील आहे. व्हिडिओमध्ये ती मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आणि तिची मुले अल्लू अरहान आणि अल्लू अरहा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. तसेच, अल्लू अर्जुन सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असतो तर स्नेहा मात्र सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. स्नेहा नेहमीच तिचे मजेशीर फोटो-व्हिडिओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. स्नेहा रेड्डीने तिचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या अशा रात्री आहेत, ज्या सकाळमध्ये बदलतात आणि मित्र कुटुंबात बदलतात.”
या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) आणि अल्लू (Allu Arjun) यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. एवढेच नाही, तर दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. इंस्टाग्रामवर तिचे ६.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.
अल्लू अर्जून आणि स्नेहा रेड्डी एका मित्राच्या लग्नात भेटले होते आणि दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते. त्यावेळी स्नेहा अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेऊन परतली होती आणि अल्लू अर्जुन तामिळ चित्रपटांचा स्टार बनला होता. स्नेहाही हैदराबाद येथील एका व्यावसायिकाची मुलगी आहे. अल्लूने जेव्हा स्नेहाच्या घरी स्थळ पाठवले तेव्हा तिच्या वडिलांनी नकार दिला होता. परंतु अनेक वृतांमध्ये असे सांगण्यात येते की, अल्लू आणि स्नेहा एकमेकांपासून वेगळे होण्यास तयार नव्हते.
हेही वाचा :