बॉलिवूड कलाकार होणे सोपी गोष्ट नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वत:च्या हिंमतीवर बॉलिवूडमध्ये टिकणे, तर त्याहून कठीण असते. मात्र, काही कलाकार असे असतात, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर टिकतात आणि एक स्थान निर्माण करतात. काबाड कष्ट करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये शाहरुख खान याचाही समावेश होतो. शाहरुख याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने घेतलेली मेहनत ही सर्वांनाच माहिती आहे. त्याने नुकतेच आपले सिनेसृष्टीतील ३० वर्षे पूर्ण केली. तसेच, तो ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत परततोय.
पठाणसाठी शाहरुखने किती रुपये घेतले?
‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ या तीन सिनेमांमधून शाहरुख खान (Shahrukh Khan) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. हे तिन्ही सिनेमे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या २ सिनेमांची सध्या शूटिंग सुरू आहे. ‘पठाण’ हा सिनेमा सर्वात चर्चेत आहे. कारण, शाहरुख याने या सिनेमासाठी आतापर्यंतची सर्वाधिक फी घेतली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख खान याला ‘पठाण’साठी १०० कोटी रुपये फी मिळत आहे. असे म्हटले जात आहे की, या सिनेमासाठी शाहरुखला भक्कम पैसा ऑफर झाला आहे.
शाहरुखने बॉलिवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्याचा जलवा आणि प्रसिद्धी कायम आहे. त्यामुळे त्याला मागेल ती रक्कम दिली जात आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, शाहरुखला ३० वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या सिनेमासाठी किती रुपये मिळाले होते?
पदार्पणातील सिनेमासाठी शाहरुखला किती रुपये मिळाले होते?
शाहरुख याने सन १९९२मध्ये आलेल्या ‘दीवाना’ या सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली नव्हती. मात्र, तो द्वितीय मुख्य भूमिकेत होता. अशा कलाकारांची एन्ट्री दुसऱ्या भागात होते. या सिनेमाच्या करारावेळी त्याला ११ हजार रुपये रक्कम मिळाली होती. त्यानंतर पूर्ण सिनेमासाठी त्याला फक्त १.५० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, फीपेक्षा जास्त त्याच्या कामाला कौतुकाची थाप मिळाली होती. यानंतर शाहरुखने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो पाहता पाहता सिनेसृष्टीचा ‘बादशाह’, ‘किंग खान’ बनला. आता तो ‘पठाण’ बनणार आहे.
शाहरुखने आतापर्यंत शंभरहून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कल हो ना हो’, ‘माय नेम इज खान’, ‘चक दे इंडिया’, ‘स्वदेस’, ‘ओम शांती ओम’ या प्रसिद्ध सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-