Friday, April 26, 2024

घृणास्पद! लैंगिक अत्याचारात दोषी आढळलेला अमेरिकेचा प्रसिद्ध गायक ३० वर्षे फोडणार खडी, आलियालाही फसवलेलं

हॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन गायक आर केली याच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला, मुलां-मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाबाबत त्याला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५५ वर्षीय अमेरिकन गायक आर केली हा एक-दोन नाही, तर तब्बल ९ आरोपांमध्ये दोषी आढळला आहे. त्याच्याविरुद्ध मागील २० वर्षांपासून न्यायालयीन खटला चालू होता.

यूएस ऍटर्नी ऑफिसने केले ट्वीट
गायक आर केली (R Kelly) याला ब्रूकलिन फेडरल न्यायालयात जस्टिस एन डोनेली यांनी ही शिक्षा सुनावली आहे. न्यू यॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसाठी यूएस ऍटर्नी ऑफिसने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आर केलीला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची (R Kelly 30 Years In Prison) शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी गायकाला किमान २५ वर्षे तुरुंगवासाची मागणी केली, कारण त्यांचा असा विश्वास होता की, तो जनतेसाठी गंभीर धोका आहे.

या प्रकरणात केली आणि त्याच्या २ सहकाऱ्यांवर २००८मध्ये पॉर्नोग्राफी चाचणीत हेराफेरी केल्याचा आणि खोटी साक्ष देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. खटल्यादरम्यान, केलीविरुद्ध साक्ष देण्यासाठी तब्बल एकूण ४५ साक्षीदार न्यायालयात हजर झाले होते.

केलीविरुद्ध आणखी एक खटला होईल सुरू
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्याने कायद्याबद्दल कोणताही पश्चात्ताप किंवा आदर दर्शविला नाही. केलीला शिकागोमध्ये आणखी एका खटल्याचा सामना करावा लागणार आहे, जो १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

अवघ्या १५ वर्षीय गायिकेसोबत केले होते लग्न
दिवंगत गायिका आलियासोबतही आर केली (R Kelly And Alia Relationship) याचे वादग्रस्त संबंध होते. त्याने गायिकेशी बेकायदेशीररीत्या लग्न केले होते. ती फक्त १५ वर्षांची होती. तिच्या माजी मॅनेजरने लग्न पूर्ण करण्यासाठी आलियाला तिची बनावट ओळख मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे कबूल केले होते.

आर केलीची गाणी
आर केली याने अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांमध्ये ‘सेम गर्ल’, ‘इग्निशन’, ‘चॅप्टर १९’, ‘आय बिलिव्ह आय कॅन फ्लाय’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा