Sunday, December 3, 2023

मोठी बातमी! शाहरुख खानची पत्नी ‘गौरी खान’ यांची अडचण वाढणार….लखनऊमध्ये FIR दाखल, नेमक काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटीपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. त्यामुळे शाहरुख चर्चेत आहे. पण आता त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे त्याची पत्नी गौरी खान. गौरी या इंटेरियर डिझायनर आणि चित्रपट निर्मात्या आहे. तिच्या गौरी यांच्या विरोधात लखनऊमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. नेमका काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गौरी यांच्या विरुद्ध अजामीनपात्र कलम 409 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​सीएमडी अनिल कुमार तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी आणि ब्रँड अँबॅसिडर गौरी खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

गौरी यांच्यावर आरोप केला आहे की, ज्या कंपनीची ती ब्रँड अँम्बेसेडर होती, त्यांनी 86 लाख रुपये आकारूनही त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी भागातील तुलसियानी गोल्फ व्ह्यू येथील फ्लॅट दुसऱ्याला देण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. गौरी यांच्या व्यतिरिक्त, तक्रारदाराने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे ​​मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलस्यानी आणि संचालक महेश तुलस्यानी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती. ब्रँड अँम्बेसेडर गौरी यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी फ्लॅट खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (actor-shahrukh-khan-wife-gauri-khan-aginst-fir-filed-in-lucknow-beacuse-of-fraud-case)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चिनीकम’ फेम अभिनेत्री स्विनी खाराचा साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती
टायगर श्रॉफला करायचे आहे हॉलिवूडमध्ये काम, म्हणाला मी’ अनेकवेळा ऑडिशन दिलेत पण…’

हे देखील वाचा