Monday, October 27, 2025
Home मराठी येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व किंजवडेकरने श्रेया डफळापुरकरसोबत उरकला साखरपुडा

येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व किंजवडेकरने श्रेया डफळापुरकरसोबत उरकला साखरपुडा

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचा मौसम आला आहे. अनेक मोठमोठे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत असताना मराठी सिनेसृष्टीमधील कलाकार कसे मागे राहतील. अशातच आता मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय असलेल्या अभिनेत्याने साखरपुडा उरकला आहे. नुकताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील ओम अर्थातच अभिनेता शाल्व किंजवडेकरने त्याच्या जुनी मैत्रिणीसोबत साखरपुडा केला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘येऊ कशी कशी मी नांदायला’. या मालिकेने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शाल्वला देखील या मालिकेने नेम, फेम मिळवून दिले. आता शाल्वला त्याच्या खऱ्या आयुष्यातली स्वीटू मिळाली आहे. 

नुकताच अभिनेता शाल्वने त्याची मैत्रीण असलेल्या श्रेयासोबत साखरपुडा केला आहे. त्याच्या या साखरपुड्याची फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तत्पूर्वी शाल्व आणि श्रेया लवकरच लग्न करणार असून त्याआधी त्यांनी साखरपुडा केला आहे. त्यांच्या या फोटोंमध्ये शाल्वने निळ्या रंगाचा सूट परिधान केला असून, श्रेयाने पांढऱ्या रंगाचा फुलांचा लेहेंगा घातला आहे. साखरपुड्याआधी या दोघांच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या या साखरपुड्याला दोघांच्या जवळच्या नातेवाईकांसोबत मित्रमंडळी देखील हजर होती.

शाल्व आणि श्रेयाच्या मेहेंदी कार्यक्रमाला दोघांनी पिवळ्या रंगाचे ड्रेस घालत ट्विनिंग केले होते. या मेहेंदीचे देखील अनेक फोटो त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्यावर इंडस्ट्रीमधून आणि फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या फॅन्सला आता त्यांच्या लग्नाची चाहूल लागली असून, ते दोघं लग्न गाठ कधी बांधणार हे जाणून घेण्यासाठी शाल्वचे चाहते उत्सुक झाले आहेत. तत्पूर्वी शाल्व आणि श्रेया दोघेही पुण्याचे असून मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहे. श्रेया ही एक स्टायलिस्ट आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अनेकदा सोशल मीडियावरही ते एकमेकांसोबत फोटो शेअर करत त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा