Friday, March 31, 2023

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

यश हा कन्नड चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. ‘केजीएफ‘ या चित्रपटामुळे यश हा देशभरातील घराेघरात पोहोचलेला आहे. पडद्यावर स्टायलिश लूक आणि डॅशिंग पर्सनॅलिटीमुळे तो लोकांचा आवडता बनला आहे. यासाेबतच गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘कंतारा‘ या चित्रपटाचा स्टार ऋषभ शेट्टीनेही असेच काहीसे केले आहे. ऋषभ शेट्टीची कामगिरी अबाधित आहे. अशातच या दोन्ही स्टार्सबाबत एक मोठी बातमी समाेर येत आहे. खरे तर, ‘द रॉकिंग स्टार‘ यश आणि ऋषभ शेट्टी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दोघांसोबत दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनीही या भेटीत सहभागी झाली असल्याची फाेटाेत दिसत आहे.

पंतप्रधानांनी दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमारांची काढली आठवण
एएनआयने अलीकडेच पीएम नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या कर्नाटक दौऱ्याची माहिती शेअर केली आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी 12 फेब्रुवारी रोजी चित्रपट कलाकार, खेळाडू आणि स्टार्टअप जगतातील लोकांची भेट घेतली. या भेटीत नरेंद्र मोदी यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार (puneeth rajkumar) यांचीही आठवण काढली.

पंतप्रधानांनी दक्षिणेकडील राज्यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक
या बैठकीला ‘केजीएफ’ स्टार यश (yash), ‘कंतरा’ अभिनेता ऋषभ शेट्टी (rishabh shetty) आणि दिवंगत अभिनेता पुनित राजकुमारची पत्नी उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट कलाकारांना सांगितले की, ‘दक्षिणेकडील राज्यांच्या फिल्म इंडस्ट्रीने त्यांच्या कामाने भारताची संस्कृती आणि ओळख मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.’ विशेषत: इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.( tollywood actor yash kantara rishabh shetty meets pm narendra modi remembers late actor puneeth rajkumar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पाकिस्तानमधील दिग्गज अभिनेते जिया मोहिउद्दीन यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा