Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड शरद मल्होत्राने ‘या’ अभिनेत्रीला आठ वर्षे केले होते डेट, ‘या’ कारणामुळे गेला नात्याला तडा

शरद मल्होत्राने ‘या’ अभिनेत्रीला आठ वर्षे केले होते डेट, ‘या’ कारणामुळे गेला नात्याला तडा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या दमदार अभिनयामुळेही चर्चेत असते. ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या टीव्ही मालिकेतून दिव्यांका घरोघरी लोकप्रिय झाली. या टीव्ही सीरियलमध्ये काम केलेला अभिनेता शरद मल्होत्रासोबत दिव्यांकाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी रंगल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी दोघांचे काही कारणाने ब्रेकअप झाले. शरद रविवारी (९ जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

शरदचा (Sharad Malhotra) जन्म ९ जानेवारी १९८३ मध्ये झाला होता. शरद ‘बनू में तेरी दुल्हन’, ‘भारत का वीर पुत्र’ आणि ‘कसम तेरे प्यार की’, ‘नागिन ५’ सारख्या शोमध्ये दिसला आहे. या अभिनेत्याने २००४ मध्ये ‘इंडिया बेस्ट सिनेस्टार की खोज’मध्ये भाग घेतला होता. त्याने २००६ मध्ये ‘बनून में तेरी दुल्हन’ या मालिकेतून पदार्पण केले. या शोमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी ‘भारत के वीर पुत्र’मध्ये महाराणा प्रताप यांची भूमिका साकारली होती.

शरदला २०२० मध्ये टीव्हीवरील टाइम्स मोस्ट डिझायरेबल मॅनमध्ये ७ वा क्रमांक मिळाला. टीव्ही शो व्यतिरिक्त शरद काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. शरद त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे.

शरद आठ वर्षांपासून ‘या’ अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशिपमध्ये

शरद त्याची को-स्टार दिव्यांका त्रिपाठीसोबत आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. ‘बनू मैं तेरी दुल्हन’च्या सेटवर दोघेही प्रेमात पडले. दोघांनीही आपले नाते अधिकृत केले होते. चाहत्यांना त्यांची ऑफ-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन जोडी खूप आवडली. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्री शरदसोबत लग्न करू इच्छित होती. पण शरद त्यांच्या नात्याला पुढे नेण्यास तयार नव्हता, त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

राजीव खंडेलवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत दिव्यांका त्रिपाठीने सांगितले होते की, त्यांचे नाते वाचवण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. “मी अंधश्रद्धेच्या टोकाला पोहोचले असल्याचे ते म्हणाले. मला विचित्र माणसं भेटायला लागली की, शरदला कोणी काही केलय का. माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. आठ वर्षांचे नाते कसे संपुष्टात आले यावर माझा विश्वास बसत नाही,” असे दिव्यांकाने सांगितले. नंतर दिव्यांकाने ‘ये है मोहब्बतें’ अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले.

शरदने २०१९ मध्ये रिप्सी भाटियासोबत लग्न केले. शरद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याचे फोटो शेअर करत असतो. एवढेच नाही, तर तो पत्नी रिप्सीसोबतचे सुंदर फोटोही शेअर करत असतो.

हेही वाचा :

हे देखील वाचा