विराजस कुलकर्णीचा साखरपुडा ते सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू, या आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील टॉप बातम्या

मनोरंजन क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे, जिथे दर दिवसाला काही ना काही रंजक किस्से आणि घटना घडत असतात. प्रेक्षकांना देखील या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतात. कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे. हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. अशातच मागील आठवड्यात देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. काही आनंदाचे क्षण साजरे झाले तर काही दुःखाचे प्रसंग देखील आले. चला तर जाणून घेऊया मागील आठवड्यात म्हणजेच २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान मराठी मनोरंजन क्षेत्रात कोणत्या गोष्टी चर्चेत राहिल्या आहेत. (top 5 news of marathi industry) 

मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अशी ज्याची ओळख आहे, तो स्वप्नील जोशी (swapnil joshi) याच्या आगामी ‘अश्वत्थ’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. पोस्टरमधील त्याचा लूक काहीसा वेगळा दिसत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमधील लूक पाहून सगळेजण त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठी ३‘ चा विजेता विशाल निकम (vishal nikam) आणि विकास पाटील (vikas patil) यांनी एकत्र जोतिबाचे दर्शन घेतले. त्यामुळे ते दोघे खूपच चर्चेत आले. बिग बॉसच्या घरात असताना त्यांच्यातील अतूट मैत्री सर्वांनी पाहिली आहे. अशातच त्यांनी एकत्र जोतिबाचे दर्शन घेतल्याने, ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असे म्हणत सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) तिचा पती कुणाल बेनोडकरसोबत फिरायला गेली होती. त्यावेळी तिने तिच्या पतीसोबत तिच्या ‘पांडू’ चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ गाण्यावर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या पतीसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वृद्धपकाळाने पुण्यात निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर मराठीमध्ये ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट देखील तयार झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (tejaswini pandit)  त्यांची भूमिका निभावली होती. त्यांच्या मृत्यूनंतर तेजस्विनीने ‘एका माणसाच्या येण्याने अनेक गोष्टी बदलतात,’ असे म्हणत सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. तिची ही पोस्ट देखील खूप चर्चेत आली होती.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

आई कुठे काय करते‘ (aai kuthe kay karate) या मालिकेत अभिषेक आणि अनघा यांचा लग्न सोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाच्या आधी होणारी हळद, मेहेंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाचा देशमुख कुटुंबाने भरभरून आनंद घेतला आहे. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ या आठवड्यात चांगलेच चर्चेत राहिले आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere) हिचा नुकतेच वाढदिवस साजरा झाला आहे. त्यानिमित्त ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी तिचा सेटवर वाढदिवस साजरा केला आणि तिला सरप्राईज दिले. तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

अभिनेता विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) यांनी साखरपुडा केला. त्यांनी गोव्यात एका क्रूझमध्ये साखरपुडा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यांचे हे फोटो जोरदार चर्चेत राहिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

चला हवा येऊ द्या‘ मालिकेतील विनोदी कलाकार श्रेया बुगडे (shreya bugade) आणि स्नेहल शिदम यांनी सोशल मीडिया ट्रेंडिंग सॉंग ‘लेझी लॅड’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्यांची ही रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओवर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

मराठी मनोरंजन सृष्टीत या आठवड्यात या गोष्टी सर्वात जास्त चर्चेत राहिल्या आहेत.

हेही वाचा :

 

 

Latest Post