विकी कौशलला इतका आवडला ‘अतरंगी रे’, की दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ अजब मागणी!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांत विकी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतच्या (Katrina Kaif) लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. दरम्यान, त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय (Anand L Rai) यांना त्यांच्या पुढील चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली आहे. तेही व्यक्तिशः नव्हे तर सोशल मीडियावर उघडपणे. त्याच्या या विनंतीला आनंद एल राय यांनीही मजेशीर उत्तर दिले आहे.

विकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विकीने डिझ्नी प्लस हॉटस्टारवर आनंद एल रायचा ‘अतरंगी रे’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया शेअर केली. त्यात त्याने केवळ चित्रपटाचे आणि चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले नाही, तर आनंद एल राय यांना त्यांच्या पुढील चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली. विकीच्या या स्टोरीमध्ये ‘अतरंगी रे’चे पोस्टर आणि त्याचे गाणेही लावण्यात आले होते. विकी या चित्रपटाने खूप प्रभावित झाला आहे.

विकीने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “किती छान चित्रपट आहे मजा आली! सारा अली खानसाठी (Sara Ali Khan) ही व्यक्तिरेखा साकारणे खूप अवघड होते आणि तुम्ही ते किती चांगले केले आहे. धनुष (Dhanush) तू एक प्रतिभावान आहेस. अक्षय कुमारने (Akshay Kumar) धमाल केली. आनंद एल राय सर कृपया मला तुमच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करा.” आनंद एल राय यांना केलेल्या या विनंतीवर त्यांनीही स्टोरीवर उत्तर दिले आहे की, “धन्यवाद माझ्या भावा आणि तुला कास्ट केले जाणार नाही, तू जेव्हा होशील तेव्हा कहाणी होईल.”

Photo Courtesy: Instagram/vickykaushal09

‘अतरंगी रे’ डिझ्नी प्लस हॉटस्टारवर २४ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने ओटीटीवर सर्वाधिक व्ह्यूजचा विक्रमही केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. त्याचवेळी विकी त्याच्या आगामी चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचे काही पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले. विकीने मागच्या वर्षी ‘उधम सिंग’ मध्ये उत्तम काम केले होते. त्याचे या चित्रपटासाठी खूप कौतुक केले गेले.

हेही नक्की वाचा-

Latest Post