Thursday, April 18, 2024

अभिनेता शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची भन्नाट कमेंट, म्हणाली “तुझी नजर..”

होणार सून मी या घरची‘ या मालिकेत काम केल्यानंतर अभिनेता शशांक केतकर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने मालिकांसोबत, नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केल आहे. सध्या टेलिव्हिजनवर त्याची खूप गाजत असलेली ‘मुरंबा’ ही मालिका सुरु आहे. त्या मालिकेतील रमा आणि अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे.

शशांक (Shashank Ketkar) सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत विविध विषयांवर बोलत चागत्यांचे लक्ष वेधून घेतो असतो. कामासोबतच तो सामाजिक मुद्द्यावर देखील तितक्या ठामपणे त्याची मत मांडत असतो. शशांक त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. शशांकच्या पोस्ट चाहत्यांच लक्ष वेधून घेतात. शशांकने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करताना कॅप्शन शशांकने लिहिले की,“माझ्यावर सर्वांची नजर”. त्याबरोबर त्याने कॅमेऱ्याचा इमोजीही शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर शशांकता खूप मोठा चाहता वर्ग आहे. अशातच त्याच्या या पोस्टवर शशांकची पत्नी प्रियांका केतकरने भन्नाट कमेंट केली आहे. तिने कमेंट करताना लिहिले की, “…आणि तुझी नजर ही फक्त माझ्यावरच असावी”. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

 शशांक केतकरच्या वर्कफ्रंडविषयी बोलायच झाले तर, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका प्रेक्षक अजूनपर्यंत कोणीही विसरले नाही. या मालिकेनंतर शशांक ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘इथेच टाका तंबू’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा..’ या मालिकांमध्ये काम करताना दिसला होता. याशिवाय ’31 दिवस’, ‘आरॉन’, ‘वन वे तिकीट’ या सिनेमांमध्ये देखील त्याने काम केला आहे.(Actor Shashank Ketkar’s wife Priyanka Ketkar commented on the photo)

अधिक वाचा-  
‘पाऊस अन् उन्हाळा…’ अक्षय कुलकर्णीची ‘ती’ पाेस्ट चर्चेत
प्रेग्नेंसीमध्ये खुललं इशिता दत्ताचं साैंदर्य, अभिनेत्रीचे सुंदर फाेटाे एकदा पाहाच 

 

हे देखील वाचा