Tuesday, June 25, 2024

‘हे तीन वेगळे सण असतात’ शशांक केतकरने ‘होळी’च्या ‘त्या’ पोस्टमधून घातले लोकांच्या डोळ्यात अंजन

आपण जर मराठी मनोरंजनविश्वात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मराठीमध्ये अनेकदा हिंदी भाषेतील मालिकांचे अनुकरण केले जाते. अनेक सण, अनेक बाबी या हिंदी मालिकांवरून प्रेरित असल्याचे आपल्याला दिसून येते. आपण अनेकदा ते बघताना ओघात बोलून जातो, ‘अरे हे तर सेम हिंदी सिरीयल सारखे दाखवताय’ मात्र या खेरीज आपण यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. कदाचित मराठीमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकरांना देखील या गोष्टी खटकत असतील मात्र ते याकडे कानाडोळा करतात. यातलेच काही कलाकार मात्र अशा गोष्टींना विरोध करताना दिसतात. असाच एक मराठीमधील हुशार अभिनेता आहे शशांक केतकर.

होणार सून मी या घरची मालिकेनंतर तर शशांकला अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी आणि ओळख प्राप्त झाली. मालिकांसोबत तो नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील दिसत असतो. सध्या टेलिव्हिजनवर त्याची तुफान गाजत असलेली ‘मुरंबा’ ही मालिका सुरु आहे. मालिकेतील रमा आणि अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेत अमाप लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेमध्ये सकीय असणारा शशांक सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तो सतत विविध विषयांवर बोलत लोकांचे लक्ष वेधून घेतो. कामासोबतच तो सामाजिक मुद्द्यावर देखील तितक्याच दृढपणे त्याची मत मांडत असतो. सध्या शशांक त्याच्या अशा एका पोस्टमुळे चांगलंच चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

लवकरच सर्वच लोकांच्या आवडीचा ‘होळी’ हा सण आपण साजरा करणार आहोत. याच संबंधित एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शशांकने त्याच्या पोस्टमधून होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी यावर भाष्य केले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमीला होळी म्हणू नका. आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी. आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्ये तरी कशाला”. या पोस्टमधून त्याने सर्वच मराठी मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या लोकांना एक विनंती केली आहे.

शशांकच्या या पोस्टवर नेटकऱ्यानी कमेंट्स करत त्याच्या मताला दुजोरा दिला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “आईशप्पथ… एकदम मुस्काडफोड… धारावाहीक लेखकांनी तर उत आणलाय, आणि त्यांच्या बिनडोक कल्पनांवर आक्षेप घ्यायला गेलं की चॅनेलची डिमांड सांगून मोकळे… वाटायचं की कलाकार तरी कसे असे निर्बुद्धपणे काहीही काम करतात… पण आजची ही पोस्ट आणि विशेषकरून त्यावरील उक्ती वाचून अभिमान वाटला की किमान कोणाचातरी स्वाभिमान शिल्लक आहे. वाह… एकच नंबर…”. शशांकच्या या पोस्टची सध्या तुफान चर्चा असून त्याची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

हे देखील वाचा