Monday, July 1, 2024

कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

शिल्पा शेट्टी एक मॉडेल, अभिनेत्री आणि व्यावसायिक महिला आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती योगा, फॅशन आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. आजकाल ती ‘सुपर डान्सर ४’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. सोशल मीडियावर शिल्पाचे प्रचंड चाहते आहेत. तिच्या नवीन पोस्ट असो किंवा जुन्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती मसालेदार पकोड्यांचा आनंद घेताना दिसत आहे. शिल्पाच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या विशेष प्रतिक्रिया येत आहेत.

बटाटे आणि कांद्याचे पकोडे प्लेट भरून दिसली खाताना
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, जेव्हा शिल्पा शेट्टी योगामधून परत येते, तेव्हा तिला पकोड्यांनी भरलेली प्लेट दिसते. बटाटे, कांदे आणि पालक यांचे कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला पाणी सुटते आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ती प्लेटमध्ये तिचे आवडते पकोडे खाऊ लागते. या दरम्यान तिला तिचा मित्र करण आणि मलायकाही आठवते. शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्रावरील आरोपांनंतर शिल्पा शेट्टीलाही सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. शिल्पाने गुन्हे शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, तिचा राज कुंद्राच्या कंपनीशी काहीही संबंध नाही.

शिल्पा शेट्टीने मोठ्या प्रोजेक्टवर केले काम
मंगलोरमध्ये जन्मलेल्या शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक उत्तम चित्रपट केले. ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘धडकन’, ‘इंसाफ’, ‘दोस्ताना’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’ या चित्रपटांमध्ये तिची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा