Friday, April 19, 2024

उतावळ्या चाहत्याचा ऋतिक रोशनसोबत बळजबरीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न, संतापलेल्या अभिनेत्याने चांगलंच झापलं

अभिनेता ऋतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात ऋतिकची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. यादरम्यान, ऋतिक रोशनचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये अभिनेता एका व्यक्तीवर संतापताना दिसत आहे.

झाले असे की, ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची मुलं रेहान, रिदान जुहूमधील एका थिएटरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, तिथे उपस्थित जमावाने असे काही केले की, ऋतिक चांगलाच संतापला.

चाहत्याने केला बळजबरीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पॅपराजी आणि बॉडीगार्डने घेरलेल्या ऋतिक रोशनसोबत बळजबरीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती ऋतिकला ढकलतानाही दिसत आहे. चाहत्यांच्या या कृतीने ऋतिकला खूप राग येतो. दरम्यान, सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला मागे खेचतात. त्यानंतर अभिनेता त्या चाहत्याला फटकारताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneh Zala (@snehzala)

व्हिडिओमध्ये दिसते की, प्रथम ऋतिक रोशनचा सुरक्षारक्षक त्या व्यक्तीला रागावतो आणि नंतर अभिनेता देखील त्याच्या कारमध्ये बसण्यापूर्वी तरुणाला फटकारतो. तो म्हणतो की, “तू काय करत आहेस?” सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऋतिकच्या या व्हिडिओवर लोक अभिनेत्याचे समर्थन करत आहेत. यासोबतच काही चाहते अभिनेत्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहनही करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेची काळजी घ्या. खासकरून जेव्हा तो मुलांसोबत असतो.”

‘विक्रम वेधा’ या दिवशी होणार रिलीज
ऋतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट यावर्षी 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

विकी कौशलने कॅटरिनासोबत केले ‘असे’ काही की; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘नक्की काय करायचं बाबा’
‘हे’ आहेत फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडे घटस्फोट, सुपरस्टारची बायको एका झटक्यात बनली 380 कोटींची मालकीण
‘अच्छा चलता हू, दुआ मे याद रखना’; ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मीम्सला उधाण

हे देखील वाचा