Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धूची स्टाईलच निराळी! फटाक्यांच्या मध्ये उडी मारत, अभिनेत्याने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीनिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. खरंतर दिवाळी हा सण सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याचा सण आहे. दिव्यांची रोषणाई, रांगोळी, फराळ, किल्ले या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण अगदी भरभरून अनुभवत असतो. अशातच सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव याने सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रंगाच्या आणि फटक्यांच्या मधे दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “ही दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो, तुमच्या घरी आनंद येवो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, शुभ दीपावली.” त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याचा आनंद आणि उत्साह साफ दिसत आहे. (Actor siddharth jadhav give best wishes of diwali on social media)

त्याच्या चाहत्यांना त्याचा हा आनंद खूप आवडला आहे. त्याचे चाहते या फोटोवर कमेंट करून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत, तर अनेकजण या फोटोवर प्रेम दर्शवत आहे. त्याच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “आपला सिद्धू नाही तर आमचा सिद्धू.” सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. त्याची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘यांचा काही नेम नाही’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जबरदस्त’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘इरादा पक्का’, ‘टारगेट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘खो-खो’, ‘ढोलकी’, ‘माऊली’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्याने ‘राधे’, ‘सिंबा’, ‘पावडर’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘आउटसोर्स’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा