मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ जाधव याचा समावेश होतो. सिद्धार्थने त्याच्या अस्सल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठीही चाहते आतुर असतात. मात्र, चाहत्यांच्या या लाडक्या अभिनेत्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने तो गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात दाखल असल्याचे पोस्टमधून सांगितले. त्याची पोस्ट पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे. तसेच, ते आता त्याच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त करू लागले आहेत. सिद्धार्थची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाला सिद्धार्थ?
अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो जोडला आहे. या फोटोत त्याचा हात दिसत असून त्याच्या मनगटावर दवाखान्याची चिट्टी बांधलेली दिसत आहे. सिद्धार्थने या फोटोसह भलेमोठे कॅप्शनही दिले आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नमस्कार… गेला आठवडाभर मी hinduja hospital मध्ये admit होतो… आज घरी आलो… मनापासून आभार hinduja hospitalच्या staffचं..खूप मनापासून काळजी घेतली माझी… अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टीम… एका phone वर नेहमीच धावून येणारे @ameyakhopkar दादा… शशांक नागवेकर दादा lv u alwyss.. @rajwadesatish दादा आणि @star_pravah परिवार तुमचा support खूप महत्त्वाचा होता… आणि माझा मोठा भाऊ Dr. lavesh jadhav जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता… मी बरा व्हाव्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं… त्यांना मनापासून धन्यवाद… आता हळूहळू बरा होतोय… खूप धावपळ असते आपली… पण त्यातही स्वतःच्या healthकडे दुर्लक्ष होणार नाही याची pls काळजी घ्या… Lv u all… #आपलासिध्दू.”
View this post on Instagram
सिद्धार्थने ही पोस्ट १५ ऑगस्ट रोजी केली होती. याच खास दिवशी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट करून त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने कमेंट करत लिहिले की, “काळजी घे मित्रा.” दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने कमेंट करत लिहिले की, “सिद्धू कृपया काळजी घे.” तसेच, अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील कमेंट करत म्हटले की, “सिद्धू काळजी घे.” दुसरीकडे, सिद्धूच्या चाहतीनेही कमेंट करत म्हटले की, “काळजी घे सिद्धार्थदा.”
सिद्धार्थचा सिनेमा
सिद्धार्थच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो पुन्हा एकदा चाहत्यांना पोट धरून हसवण्यासाठी ‘दे धक्का २’ या सिनेमात झळकला. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्या ‘दे धक्का’ या सिनेमातील ‘धनाजी’ या पात्राला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता सीक्वलमधील ‘धनाजी’ही चाहत्यांची मने जिंकताना दिसतोय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ अभिनेत्रीने नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या नात्याला पाडलं खिंडार, जीवापाड करायचे एकमेकांवर प्रेम
धक्कादायक! प्रसिद्ध गायकावर लैंगिक अत्या’चाराचा गुन्हा दाखल, फ्लॅटवर बोलवून कॉस्च्युम स्टायलिस्टवर…
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर अडचणीत आला आमिर खान, वितरकांना द्यावी लागणार ‘इतकी’ भरपाई