Thursday, June 13, 2024

प्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, भावाने दिली हेल्थ अपडेट; चाहत्यांना म्हणाला, ‘प्रार्थना करा…’

कलाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक निगम याच्याविषयी ही बातमी आहे. अभिषेक सध्या त्याच्या तब्येतीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. त्याला एक दिवसापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात त्याचा भाऊ आणि अभिनेता सिद्धार्थ निगम याने त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

अभिषेक निगम रुग्णालयात ऍडमिट
सिद्धार्थ निगम (Siddharth Nigam) याने सोशल मीडियाद्वारे मोठा भाऊ अभिषेक निगम (Abhishek Nigam) याचे हॉस्पिटलमधील बेडवर झोपल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, “लवकर बरा हो दादा.” यानंतर अभिषेकचे चाहते चिंतेत पडले होते की, अभिनेत्याला नेमकं काय झालं आहे. अशात सिद्धार्थने काही वेळानंतर याबाबत एक नोट शेअर करत लिहिले की, अभिषेकला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे आणि गंभीर होण्याचं काही कारण नाहीये.

Abhishek-Singh-Story
Photo Courtesy: Instagram/theabhisheknigam

सिद्धार्थची नोट
सिद्धार्थने नोटमध्ये लिहिले की, “हाय अभिषेकच्या चाहत्यांनो. चिंता करू नका, हे फक्त व्हायरल इन्फेक्शन आहे. डेंग्यू किंवा मलेरिया नाहीये. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. तो लवकरच बरा होईल. होय, व्हायरल इन्फेक्शन प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या. सुरक्षित आणि स्वस्थ राहा. अभिषेक लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा.”

अभिषेक निगमने दिली तब्येतीची माहिती
दुसरीकडे अभिषेक निगमनेही चाहत्यांना त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, “तीन दिवसांनंतर चांगली झोप लागली. त्यामुळे माझ्यासाठी आजची सकाळ वास्तवात एक चांगली सकाळ आहे.” यासह त्याने असेही सांगितले की, त्याला उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

Abhishek-Nigam
Photo Courtesy: Instagram/theabhisheknigam

अभिषेकच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो ‘अलीबाबा: दास्तान ए काबूल’ या मालिकेत दिसला होता. या मालिकते त्याला शीजान खान याच्या जागी काम मिळाले होते. त्यामुळे तो भलताच चर्चेत होता.

सिद्धार्थचे सलमान खानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण
खरं तर, अभिषेक निगम हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून आपले नाव कमावले आहे. त्याची सोशल मीडियावरही तगडी फॅन फॉलोविंग आहे. तो अभिनेता सिद्धार्थ निगम याचा मोठा भाऊ आहे. सिद्धार्थने याच वर्षी सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (actor siddharth nigam brother abhishek in hospital actor requests pray for recovery)

महत्त्वाच्या बातम्या-
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधून धक्कादायक बातमी! स्पर्धकाच्या डोक्याला लागली आग, पाहून शिल्पा-किरणलाही शॉक
‘अनेक पाकिस्तानी महिलांचे पती भारतीय…’, सीमा हैदरला पाठिंबा देत प्रसिद्ध कलाकाराचे खळबळजनक भाष्य

हे देखील वाचा