अभिनेता सलमान खानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सलमानला इंडस्ट्रीत दबंग खान म्हणून ओळखले जाते. सलमानचे चाहते भारताच नव्हे तर परदेशात सुद्धा आहेत. सलमानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. सलमानशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता सलमानचे नाव घेऊन सिनेविश्वात मोठा घोटाळा केला जात आहे. याचा सुगावा सलमानला लागला आहे. त्यांनी नोटीस बजावल्याने गुंडांचे पोपटपंची झाली आहे.
सलमान खानने (Salman Khan) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सलमानने लिहिले की, “सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स सध्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी कास्ट करत नाहीत. भविष्यातील कोणत्याही चित्रपटासाठी आम्ही कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती केलेली नाही किंवा नियुक्त करत नाही.प्लिज तुम्हाला कास्टिंगशी संबंधित कोणताही मेल किंवा संदेश प्राप्त झाल्यास विश्वास ठेवू नका. जर कोणी सलमान खान आणि सलमान खानच्या चित्रपटाचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरताना आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
सलमान खानच्या नावाचा गैरवापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2020 मध्ये देखील अशी बातमी आली होती की सलमान खान त्याच्या चित्रपटांसाठी कास्टिंग करत आहे. त्याने कास्टिंग एजंट्सची नियुक्ती केली आहे. त्यावेळीही सलमान खानने या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्यांना इशारा देऊन सोडले होते. मात्र, आता हे प्रकरण गंभीर दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्याने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
View this post on Instagram
सलमान खान विषयी बोलायच झाले तर, सध्या सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसत आहे. अभिनेता सलमान ‘टायगर 3’ चित्रपटात झळकणार आहे. त्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात इमरान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (entertainment Actor salman khan shares official notice on casting for films under his production house avn)
अधिक वाचा-
–दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा
–दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा