करण जोहर हा जेवढे मजेदार चित्रपट बनवतो, तेवढ्याच मजेदारपणे सूत्रसंचालनही करतो. त्याचा ‘कॉफी विथ करण ७‘ हा शो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत खूप कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये कलाकारांच्या दैनंदिन जीवनातील वैयक्तिक प्रश्न विचारले जातात, आणि आता या कार्यक्रमात करणने विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना बोलावले आहे. करणने सिद्धार्थला एक्स गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला आहे.
काही काळापूर्वी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांना खूप ठिकाणी स्पॉट केले होते. त्या दोघांनी बॉलिबूडमध्ये एकाच चित्रपटातून पदार्पण केले होते. अशात आता करणच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले आहे की, ते एकमेकांना डेट करत होते.
‘कॉफी विथ करण’ याच्या नवीन एपिसोडमध्ये सिद्धार्थला त्याने विचारले आहे की, तू तुझ्या एक्स गर्लफ्रेंडची आठवण काढत आहात का? यावर सिद्धार्थने लगेच उत्तर दिले की, “तिची मांजर.” एवढं बोलल्यानंतर लगेच कळत आहे की, तो नेमका कोणाबद्दल बोलत आहे. सगळ्यांना माहित आहे की, आलियाला मांजरी किती आवडतात. आलियाने लग्नाच्या दिवशीही तिच्या मांजरींसोबत फोटो काढले होते. आलियासासोबत तिचे चाहतेही तिच्या मांजरीचे फॅन आहेत.
आलिया आणि सिद्धार्थ यांचा २०१९मध्ये ब्रेकअप झाला होता. जेव्हा आलियाला या विषयावर विचारले, तर तिने सांगितले की, “माझ्या मनात सिद्धार्थविषयी खूप प्रेम आणि सन्मान आहे. आम्ही दोघांनी एकसोबतच इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात केली होती. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखते. आमच्यामध्ये खूप परस्पर समंजसपणा आहे. आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या मनात सकारात्मक गोष्टी आहेत.”
सिद्धार्थ सध्या कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, असे त्याने या कार्यक्रमात कबूल केले. ‘शेरशाह’ या चित्रपटाद्वारे दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते दोघेही खूप जवळ आले होते. कियारा ही काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैय्या 2’ या चित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यानंतर ती ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात वरुण धवन याच्यासोबत दिसली होती.(actor sidharth malhotra reveals he still misses ex girlfriend alia bhatt scat)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तो चुकीचा सिनेमा बनवत आहे’, आर माधवनने सांगितले आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचे कारण
वाचव रे देवा! मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजूची तब्येत पुन्हा बिघडली, आठवड्यापासून शुद्ध आलीच नाही
‘मग मी काय ऍबॉर्शन करू का?’ मुलीच्या जन्मानंतर ४ महिन्यातच प्रेग्नेंट राहिल्यावर ट्रॉलर्सला अभिनेत्रीचे उत्तर