Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Siddharth Shukla Birth Anniversary| रश्मीसोबत भांडण, तर शहनाझशी प्रेम; चांगलीच चर्चेत राहिली सिद्धार्थ शुक्लाची लव्ह लाईफ

Siddharth Shukla Birth Anniversary| ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शोपैकी एक आहे. या शोच्या तेराव्या पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्लाने2 सप्टेबर 2021 जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ आपल्या आक्रमक स्वभावामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने आपल्या लव्हलाईफमुळेही सर्वांचे लक्ष वेधले होते. अशातच सिद्धार्थ शुक्लाचा जन्म  दि. 12 डिसेंबरला झाला आहे. चला तर मग यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याची लव्हलाईफ.

शहनाझ गिलसोबत चांगली बाँडिंग
‘बिग बॉस १३’मध्ये सिद्धार्थ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिलमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळाली होती. तो शोमध्ये शहनाझसोबत रोमान्स करताना दिसला होता. कधी- कधी दोघांमध्ये भांडणेही झाली होती. मात्र, असे असूनही दोघांच्या शानदार केमिस्ट्रीने बिग बॉस १३मध्ये सर्वात जास्त पसंती मिळवली होती. (Actor Sidharth Shukla Died Beautiful Bonding Love With Shehnaaz Gill Bigg Boss 13 Winner)

त्यांची जोडी इतकी प्रसिद्ध होती की, सोशल मीडियावरही ‘सिडनाझ’ हॅशटॅग नेहमी ट्रेंडिंग असायचा. दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळत होता. तरीही, दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांना चांगले मित्र मानायचे. इतकेच नव्हे, तर ते सोशल मीडियावरही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करायचे.

शहनाझच्या यशावर सिद्धार्थ तिला प्रेरित करत होता. दुसरीकडे शहनाझही सिद्धार्थला नेहमीच चीयर करायची. दोघेही ‘भुला दूंगा’ आणि ‘शोना- शोना’ या गाण्यांमध्ये झळकले होते. या दोन्ही गाण्यांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

शहनाझव्यतिरिक्त या अभिनेत्रींशी जोडले होते नाव
केवळ शहनाझच नाही, तर सिद्धार्थ शुक्लाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

रश्मी देसाई
‘बिग बॉस १३’ची स्पर्धक रश्मी देसाईसोबतही सिद्धार्थचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. खंर तर, शोमध्ये दोघांचे बाँडिंग काही खास नव्हते, ते  एकमेकांशी भांडताना दिसायचे. बिग बॉसपूर्वी त्यांनी ‘दिस से दिल तक’ या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

पवित्रा पुनिया
सध्याच्या काळात एजाज खानसोबत आपल्या अफेअरमुळे चर्चेत असलेल्या पवित्रा पुनियासोबतही एकेकाळी सिद्धार्थचे नाव जोडले गेले होते. ज्यावेळी दोघेही ‘लव्ह यू जिंदगी’ या मालिकेत एकत्र काम करायचे, तेव्हा दोघांमध्ये शानदार बाँडिंग पाहायला मिळाली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. तरीही, त्यांनी कधीही यावर अधिकृतरीत्या कोणतेही विधान केले नाही.

शेफाली जरीवाला
‘बिग बॉस’चा भाग बनलेल्या शेफाली जरीवालासोबतही सिद्धार्थचे अफेअर असल्याच्या चर्चां व्हायच्या. शेफालीने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला होता की, “एकमेकांना डेट करणे बंद केल्यानंतरही आम्ही एकमेकांना भेटायचो.”

सिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र, चाहत्यांना शहनाझसोबतची त्याची बाँडिंग खूप आवडली. असे असले तरीही, वाईट या गोष्टीचं आहे की, सिद्धार्थच्या निधनाने त्यांची ही बाँडिंग तुटली आहे. सिद्धार्थने वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

हेही नक्की वाचा-
‘ड्रिम गर्ल 2’च्या मोहिनी पुढे बाकी सर्व फिकचं! आयुष्मानच्या सिनेमानं कमावले ‘इतके’ कोटी
शाहरूख खानला भेटण्यासाठी फॅनने केले ‘असे’ कृत्य; अभिनेता म्हणाला, ‘मला आधी…’

हे देखील वाचा